Netravati Express: बाप्पाच्या भक्तांसाठी आनंदाची बातमी, नेत्रावती एक्सप्रेसचा कोकणात महत्त्वाचा थांबा

Published : Aug 18, 2025, 05:24 PM ISTUpdated : Aug 18, 2025, 05:27 PM IST

Netravati Express: गणेशोत्सवाच्या निमित्ताने कोकणात जाणाऱ्या भाविकांसाठी रेल्वे प्रशासनाने लोकमान्य टिळक टर्मिनस - तिरुवनंतपूरम - एलटीटी नेत्रावती एक्स्प्रेसला राजापूर रोड स्टेशनवर थांबा देण्याचा निर्णय घेतला आहे. 

PREV
15

मुंबई : गणेशोत्सवाच्या धामधुमीत कोकणात जाणाऱ्या भाविकांसाठी एक चांगली बातमी आहे. रेल्वे प्रशासनाने लोकमान्य टिळक टर्मिनस - तिरुवनंतपूरम - एलटीटी नेत्रावती एक्स्प्रेसला आता राजापूर रोड स्टेशनवर थांबा देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. यामुळे राजापूर आणि आसपासच्या भागातील कोकणवासीयांना मोठा फायदा होणार आहे. गणेशोत्सव काळात कोकणात जाणाऱ्या रेल्वेमध्ये प्रचंड गर्दी होते, आणि ही गर्दी कमी करण्यासाठी मध्य आणि पश्चिम रेल्वेकडून विशेष गाड्या सोडल्या जातात. याच प्रयत्नांचा एक भाग म्हणून हा नवीन थांबा सुरू करण्यात आला आहे.

25

रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, 16345 लोकमान्य टिळक टर्मिनस ते तिरुवनंतपुरम ही गाडी संध्याकाळी 7 वाजून 40 मिनिटांनी राजापूर रोडला पोहोचेल. तर, परतीच्या प्रवासात 16346 तिरुवनंतपुरम ते लोकमान्य टिळक टर्मिनस ही गाडी सकाळी 7 वाजून 37 मिनिटांनी राजापूर रोड स्टेशनवर थांबेल. दोन्ही गाड्यांचा हा थांबा दोन मिनिटांसाठी असेल. या वेळेची सविस्तर माहिती घेण्यासाठी तुम्ही www.enquiry.indianrail.gov.in या अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकता.

35

गणेशोत्सवासाठी विशेष रेल्वे गाड्या

यंदाच्या गणेशोत्सवासाठी रेल्वेने आधीच 250 विशेष गाड्यांची घोषणा केली आहे. याशिवाय, मध्य रेल्वेने आणखी 44 गणपती विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. याचा थेट फायदा कोकणातील गणेशभक्तांना होणार आहे.

45

एलटीटी - सावंतवाडी द्वैसाप्ताहिक विशेष गाडी

या गणेशोत्सवासाठी लोकमान्य टिळक टर्मिनस-सावंतवाडी रोड-लोकमान्य टिळक टर्मिनस अशी द्वैसाप्ताहिक विशेष गाडीही चालवली जात आहे, तिच्या एकूण आठ फेऱ्या होणार आहेत. ही गाडी 28 आणि 31 ऑगस्ट तसेच 4 आणि 7 सप्टेंबर रोजी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून सकाळी 8.45 वाजता सुटेल आणि त्याच दिवशी रात्री 10.20 वाजता सावंतवाडीला पोहोचेल.

55

परतीच्या प्रवासात ती याच तारखांना सावंतवाडीहून रात्री 11.20 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी दुपारी 12.30 वाजता लोकमान्य टिळक टर्मिनसला पोहोचेल. या गाडीचे आरक्षण 3 ऑगस्ट पासून सुरू झाले आहे. या विशेष गाड्यांमुळे कोकणातील गणेशोत्सव अधिक सोयीस्कर आणि सुखद होईल.

RG
About the Author

Rameshwar Gavhane

रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.Read More...
Read more Photos on

Recommended Stories