कोकण किनारपट्टीवर मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचले आहे. सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी करण्यात आला असून, मुंबई आणि ठाणे शहराला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांना अतिवृष्टीचा इशारा, मुंबईत जोरदार पाऊस पडणार
कोकणासोबत मुंबई आणि ठाणे परिसरात जोरदार पाऊस पडणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कोकणातील तीन जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.
26
पाण्यामुळे नागरिकांची उडाली तारांबळ
आज कोकण किनारपट्टीवर पावसाने चांगली सुरुवात केली आहे. मागच्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत असून अनेक ठिकाणी पावसाचे पाणी साचत असल्याचं दिसून आलं आहे.
36
कोकणात मुसळधार पाऊस होणार
सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगड या तीनही जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे कोकणात आज मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
46
नागरिकांना सतर्क राहण्याचं केलं अवाहन
प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि नदी-ओढ्यांच्या काठावर जाण्याचे टाळण्याचे आवाहन केले आहे. कोकण किनारपट्टीवरील नागरिकांना काळजी घेण्याचं अवाहन केलं आहे.
56
मुंबईत मुसळधार पावसाच्या सरी कोसळणार
मुंबईमध्ये मुसळधार पावसाच्या सरी कोसळणार असल्याची शक्यता वर्तवली आहे. आज मुंबईत ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. पावसाचा परिणाम वाहतुकीवर झाल्याचं दिसून आलं आहे.
66
ठाणे शहराला ऑरेंज अलर्ट
ठाणे शहराला ऑरेंज अलर्ट हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. पावसाच्या साचलेल्या पाण्यामुळे ट्रॅफिकची समस्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे.