Maharashtra Rains : महाराष्ट्राला पावसाचा तडाखा; पालघर, रायगडसह साताऱ्यातील जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी

Published : Aug 18, 2025, 08:40 AM IST

मुंबई : राज्यात पावासाचा जोर वाढला गेला आहे. यामुळे हवामान खात्याकडून काही जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. याशिवाय धरणांमधील पाण्याची पातळी वाढल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. 

PREV
18
राज्याला पावसाने झोडपले

गोवा, महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये पुढचे सात दिवस मुसळधार पावसाचा इशारा आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात १९ ऑगस्टपर्यंत अति मुसळधार पावसाचं संकट राहील. तर २० ऑगस्टलाही मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाचे तज्ज्ञ उमाशंकर दास यांनी वर्तवला आहे. बंगालच्या उपसागर आणि अरबी समुद्रात दोन कमी दाबाचे पट्टे तयार झाल्याने ही स्थिती उद्भवली आहे.

28
मुंबई-रायगडमध्ये मुसळधार पाऊस

मुंबई, ठाणे, उपनगर, नवी मुंबई आणि रायगडमध्ये रात्रभर पाऊस सुरू होता. पहाटेपासून पावसाचा जोर अधिक वाढला. पुढील ३ ते ४ तासांत मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत अति मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज आहे. मंत्रालयाकडून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

38
मराठवाड्यातही मुसळधार पावसाची शक्यता

पुढील ३ तासांत छ. संभाजीनगर, बीड, हिंगोली, जालना, नांदेड आणि परभणी जिल्ह्यांत मुसळधार पाऊस होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

48
रेड अलर्ट जारी

पालघर, रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर, पुणे घाटमाथा आणि सातारा जिल्ह्यांसाठी पुढील २४ ते ४८ तास रेड अलर्ट देण्यात आला आहे. घाटमाथा आणि तळ कोकणात वादळी वारे, विजांचा कडकडाट आणि मुसळधार पाऊस होणार आहे.

58
धरणं भरली, विसर्ग सुरू

राज्यातील मुसळधार पावसामुळे धरणांची पाणीपातळी झपाट्याने वाढली आहे. गोंदियातील इटियाडोह धरण भरून वाहत असून नदीकाठच्या गावांना हायअलर्ट देण्यात आला आहे. उत्तर महाराष्ट्रातील हतनुर धरणाचे १४ दरवाजे उघडण्यात आले आहेत. कोल्हापूरच्या राधानगरी धरणातूनही विसर्ग सुरू आहे.

68
कोयना व तुळशी धरणामुळे दिलासा

पश्चिम घाट भागातील कोयना धरणाचा जलसाठा वाढल्याने वीज निर्मिती गृहातून विसर्ग सुरू झाला आहे. तर मुंबईतील तुळशी तलाव भरून वाहू लागल्याने मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला आहे.

78
ढगफुटीमुळे जनजीवन विस्कळीत

वाशिमच्या मालेगाव तालुक्यात ढगफुटी सदृश पावसामुळे नाले-नद्यांना पूर आला. त्यामुळे शेतात पाणी शिरून उभी पिकं वाहून गेली. मेडशी गावात अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांचे हाल झाले. परभणीच्या पूर्णा तालुक्यातील आहेरवाडी गावाजवळील नदीला पूर आल्याने पूल पाण्याखाली गेला आणि गावाचा संपर्क तुटला.

88
नंदुरबारात गोमाई नदी दुथडी भरून वाहिली

नंदुरबार जिल्ह्यात गोमाई नदी दुथडी भरून वाहत आहे. मध्यप्रदेशात झालेल्या पावसामुळे नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली आहे. पावसाने थोडी विश्रांती घेतल्याने स्थानिक नागरिकांनी दुथडी भरून वाहणारी नदी पाहण्यासाठी मोठ्या संख्येने गर्दी केली.

Read more Photos on

Recommended Stories