कल्याणकडे जाणाऱ्या एसी लोकलमध्ये महिलांच्या डब्यात नग्न व्यक्तीचा प्रवेश

मुंबईच्या मध्य रेल्वेच्या एसी लोकलमधील महिला डब्यात एका नग्न पुरुषाने प्रवेश केल्याने प्रवाशांमध्ये खळबळ उडाली. सोमवारी संध्याकाळी सीएसएमटी ते कल्याण दरम्यानच्या प्रवासात घाटकोपर स्थानकावर ही घटना घडली. 

मुंबई : मध्य रेल्वेच्या एसी लोकल ट्रेनच्या महिला डब्यात अचानक एक नग्न पुरुष घुसल्याने एकच गोंधळ उडाला. ही घटना सोमवारी संध्याकाळी ४.११ वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) येथून कल्याणकडे जाणाऱ्या लोकलमध्ये घडली. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

घाटकोपर स्थानकात ट्रेन थांबली असताना नग्न पुरुष डब्यात चढला आणि प्रवाशांमध्ये घबराट निर्माण झाली. त्या व्यक्तीला बाहेर जाण्यास सांगितल्यानंतरही तो माणूस बाहेर पडला नाही. त्या व्यक्तीला पाहताच महिलांनी आरडाओरडा करण्यास सुरुवात केली आणि पुढच्या बोगीत उपस्थित असलेल्या टीसीला बोलावले. मात्र, महिलांचा आवाज ऐकून मोटरमनने रेल्वे थांबवली. टीसीने त्या व्यक्तीला स्टेशनवर ट्रेनमधून बाहेर ढकलले.

व्यक्ती मानसिकदृष्ट्या अस्थिर : रेल्वे अधिकारी

रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले की, व्यक्ती मानसिकदृष्ट्या अस्थिर होती आणि ती चुकून ट्रेनमध्ये घुसली. जीआरपीने त्याला लगेच पकडले आणि त्याला कपडे घालायला लावले आणि स्टेशनच्या बाहेर सोडले. महिलांच्या सुरक्षेवर गंभीर प्रश्न उपस्थित करत गर्दी नसतानाही घटना कशी घडली? एसी ट्रेनचे दरवाजे बंद होतात. त्यामुळे असा प्रकार कसा घडला, याची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.

आणखी वाचा-

डोंबिवलीत माणकोली पुलावरून उडी मारून १५ वर्षीय मुलीची आत्महत्या

शिंदे गटाच्या मंत्र्यांकडून प्रतिज्ञापत्रावर सही? काय आहे प्रकरण

Share this article