मुंबई: महाराष्ट्रात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना एक नवीन पाऊल टाकणार आहे. पक्ष आपल्या मंत्र्यांकडून शपथपत्र लिहून घेण्याच्या विचारात आहे ज्यामध्ये ते अडीच वर्षांनी पद सोडण्यास संमती देतील. मंत्रिमंडळात स्थान मिळवण्यात अपयशी ठरलेल्या नाराज आमदारांचा दबाव लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले जात आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घोषणा केली की, ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मंत्र्यांचे परफॉर्मन्स ऑडिट करतील. चांगली कामगिरी करणाऱ्या मंत्र्यांनाच पदावर राहण्याची परवानगी असेल. शिवसेनेच्या आमदारांमध्ये सत्तेबाबत असंतोष वाढत असल्याचे शिंदे यांच्या निकटवर्तीयाने उघड केले. तोच समतोल साधण्यासाठी हे पाऊल उचलले जात आहे.
महाराष्ट्रात महायुती सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारावेळी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत नाराजी बघायला मिळाली. आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी पक्षाच्या उपनेतेपदाचा राजीनामा दिला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मंत्रिपद न मिळाल्याने नरेंद्र भोंडेकर संतापले होते. नरेंद्र भोंडेकर हे भंडाराचे आमदार आहेत. पक्षाचं पूर्व विदर्भ समन्वयकाचा पद त्यांच्याकडे होतं. त्यांनी त्या पदाचा राजीनामा दिला आहे. सोबतच शिवसेनेच्या उपनेते पदाचा राजीनामाही त्यांनी दिला आहे. नरेंद्र भोंडेकर यांनी आमदारकीचा राजीनामा दिलेला नाही.
महाराष्ट्र मंत्रिमंडळाच्या नुकत्याच झालेल्या विस्तारात ३९ आमदारांनी शपथ घेतली. यामध्ये भाजपच्या १९, शिंदे गटाच्या ११ आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या ९ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे.
एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या मंत्रिमंडळातील नेत्यांचा पत्ता कट केला आहे. त्यामध्ये दीपक केसरकर, तानाजी सावंत आणि अब्दुल सत्तार यांच्या नावाचा समावेश आहे
आणखी वाचा-
शिवसेनेत नाराजी! नरेंद्र भोंडेकरांचा सेनेतील पक्षाच्या उपनेतेपदाचा राजीनामा
फडणवीस यांच्या मंत्रिमंडळाचा नागपुरात शपथविधी संपन्न, 39 मंत्र्यांनी घेतली शपथ