Municipal Elections 2026 : आज मुंबई-पुण्यासह राज्यातील २९ महापालिकांच्या निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे. आज मतदार आपले मत मतदान पेटीत बंद करणार आहे. शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे आणि भाजपा यांच्यासह अन्य पक्ष देखील आजच्या मतदानासाठी फार उत्सुक असून किती मतदान होणार याकडे लक्ष लावून आहे. सकाळी ७ वाजल्यापासून मतदान सुरू होणार असून संध्याकाळी ५.३० वाजेपर्यंत मतदान असणार आहे. यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडून मोठ्या प्रमाणात मतदान करावे असे आवाहन करण्यात आले आहे.

07:46 PM (IST) Jan 15
Foods to Avoid in Winter to Prevent Cold Cough fever sneezing : हिवाळ्यात रोगप्रतिकारकशक्ती वाढवणारे पदार्थ खाण्यावर लक्ष केंद्रित केलं पाहिजे. यावेळी काही पदार्थ खाणं टाळायला हवं. चला जाणून घेऊया कोणते पदार्थ टाळावेत.
04:17 PM (IST) Jan 15
New Bajaj Chetak : बजाज ऑटो लवकरच आपली नवीन पिढीची चेतक इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च करणार आहे. हे नवीन मॉडेल नवीन डिस्प्ले, हब-माउंटेड मोटर अशा अनेक बदलांसह येण्याची शक्यता आहे.
04:13 PM (IST) Jan 15
PM Kisan Yojana 22th Installment : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या २२ व्या हप्त्याची प्रतीक्षा लवकरच संपणार असून, ही रक्कम जानेवारी ते मार्च २०२६ दरम्यान जमा होण्याची शक्यताय. मात्र, सरकारने यावेळी 'फार्मर आयडी' अनिवार्य केला.
03:48 PM (IST) Jan 15
BMC Election 2026 : महापालिका निवडणुकांतील मतदानाच्या शाईबाबत पसरलेल्या आरोपांवर राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी स्पष्टीकरण दिले आहे. शाई पुसली जात नसून, 2011 पासून वापरात असलेलेच मार्कर पेन वापरले जात असल्याचा दावा त्यांनी केला.
03:04 PM (IST) Jan 15
BMC Election 2026 : महापालिका निवडणुकांच्या मतदानादरम्यान बोटावरील शाई, ईव्हीएम, मतदार यादी आणि दुबार मतदारांवरून उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोग व सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली. “लोकशाही पुसली जात आहे,” असा आरोप देखील केला.
01:03 PM (IST) Jan 15
BMC Election 2026 : मुंबई महानगरपालिका निवडणूक २०२६ दरम्यान मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी प्रशासन, निवडणूक आयोग आणि सत्ताधाऱ्यांवर तीव्र टीका केली.
12:26 PM (IST) Jan 15
BMC Election 2026 : मुंबई महानगरपालिका निवडणूक २०२६ दरम्यान ईव्हीएम मशिन्स, मतदार याद्या आणि मतदान व्यवस्थेत मोठ्या प्रमाणात घोळ सुरू असल्याचा आरोप मनसे नेते अविनाश जाधव यांनी केला आहे.
11:49 AM (IST) Jan 15
BMC Election 2026 : मुंबई महापालिका निवडणुकीदरम्यान मतदारांच्या बोटावरील मार्करची खूण पुसली जात असल्याचा प्रकार उघडकीस आल्याने निवडणूक आयोगाच्या निर्णयांवर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
10:30 AM (IST) Jan 15
Indian Auto Sales December 2025 : सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरर्स (SIAM) च्या आकडेवारीनुसार, डिसेंबर 2025 मध्ये भारतीय वाहन विक्रीत 27% वाढ झाली. एसयूव्ही (SUV) आणि दुचाकींच्या विक्रमी मागणीमुळे ही वाढ झाली आहे.
09:15 AM (IST) Jan 15
Maharashtra Municipal Elections : महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नागपूरमध्ये भाजप उमेदवारावर हल्ला तर नाशिकमध्ये शिवसेना उमेदवाराविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल झाल्याने तणाव वाढला आहे.
08:58 AM (IST) Jan 15
Mumbai Pune Nagpur Municipal corporator payment : महापालिकेच्या नगरसेवकांना पगार मिळतो की नाही? त्यांना पगार मिळतो की मानधन? इतर भत्ते किती मिळतात? निवडणुकीवर कोट्यवधी खर्च करणारे नगरसेवक कसे पैसे कमवतात? वाचा सविस्तर माहिती
08:14 AM (IST) Jan 15
Mumbai Municipal corporation election 2026 : महापालिका निवडणुकीत सर्वच उमेदवारांनी प्रचारासाठी कोट्यवधी रुपये खर्च केल्याचे आकडे आहेत. पण या नगरसेवकांना किती पगार मिळतो, त्यांना भत्ते किती मिळतात, त्यांना काय लाभ असतात, जाणून घ्या.
07:50 AM (IST) Jan 15
महापालिका निवडणुकीपूर्वी मनसेचे मुंबईतील अधिकृत उमेदवार यशवंत किल्लेदार यांनी श्री. सिद्धिविनायक मंदिरात दर्शन घेतले. यानंतर माध्यमांशी बोलताना म्हटले की, मी आता मतदान करायला जाणार आहे. पण मतदानापूर्वी सिद्धिविनायक मंदिरात आलोय. एखादे नवे काम करण्यापूर्वी मी असे करतो. मी बाप्पाचे दर्शन घेण्यासह त्याचे आशीर्वाद घेतो. मुंबईत शिवसेना-मनसे युतीचा विजय होईल असा विश्वास यशवंत किल्लेदार यांनी व्यक्त केला. याशिवाय मराठी व्यक्तीच महापौर पदी बसेल असे म्हटले.
07:43 AM (IST) Jan 15
बॉलिवूडमधील अभिनेता अक्षय कुमार मुंबई महानगरपालिकेसाठी सुरू झालेल्या मतदानासाठी गांधी शिक्षण भवन येथे पोहोचला. यानंतर मतदान केल्यानंतर माध्यमांशी बोलताना त्याने नागरिकांना मतदान करण्याचे आवाहन केले.
07:39 AM (IST) Jan 15
RSS चे प्रमुख डॉ. मोहन भागवत यांनी सकाळी लवकरच मतदान केले आहे. यांचे मतदान केंद्र नागपूरमधील महाल येथील भाऊजी दप्तरी एनमसी स्कूल येथे आहे. मतदान केल्यानंतर त्यांनी पत्रकारांसमोर आपण मत दिल्याचे बोट दाखवले.
07:35 AM (IST) Jan 15
मुंबई-पुण्यासह राज्यातील महापालिका निवडणुकीसाठी आज सकाळी ७ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली आहे. विविध ठिकाणच्या मतदान केंद्रावर आता हळूहळू नागरिक ते नेते मंडळी आपले मत मतपेटीत बंद करणार आहेत.