Maharashtra Rain Alert: हवामान विभागाने महाराष्ट्रातील २३ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा दिला असून यलो अलर्ट जारी केला. दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यताय तर कोकण आणि उत्तर महाराष्ट्रात ढगाळ वातावरण राहील.
मुंबई: भारतीय हवामान विभागाने राज्यातील काही भागांसाठी जोरदार ते मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. येत्या १२ सप्टेंबर रोजी महाराष्ट्रातील हवामानात मोठा बदल होण्याची शक्यता असून २३ जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
28
दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता
राज्यातील दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. यामुळे या भागातील नागरिकांनी सावध राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
38
कोकण आणि उत्तर महाराष्ट्रात ढगाळ वातावरण, हलक्या पावसाची शक्यता
कोकण किनारपट्टी आणि उत्तर महाराष्ट्रात ढगाळ हवामान राहील. काही भागांत हलक्या पावसाच्या सरी पडण्याची शक्यता आहे. मुंबई शहर आणि उपनगरांमध्येही आकाश ढगाळ राहील. कमाल तापमान ३०°C तर किमान तापमान २२°C च्या आसपास राहण्याची शक्यता आहे. मुंबईसह कोकणातील इतर जिल्ह्यांत पावसाचा इशारा नाही.
पुणे, सातारा, सांगली आणि सोलापूर या पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. विशेषतः सोलापूर जिल्ह्यात काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे.
58
उत्तर महाराष्ट्र – फक्त अहिल्यानगरला अलर्ट
उत्तर महाराष्ट्रातील केवळ अहिल्यानगर जिल्ह्याला यलो अलर्ट देण्यात आला आहे. धुळे, नाशिक, नंदुरबार आणि जळगाव या जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
68
मराठवाडा – काही जिल्ह्यांत मुसळधार पावसाची शक्यता
मराठवाड्यातील परभणी, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. धाराशिव व लातूर जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. जालना आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता वर्तवली आहे.
78
विदर्भात मुसळधार पावसाचा धोका, सर्व जिल्ह्यांना यलो अलर्ट
विदर्भातील सर्व ११ जिल्ह्यांमध्ये (वाशिम, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली इत्यादी) मुसळधार पावसाची शक्यता असून, विजांचा कडकडाटही होऊ शकतो. हवामान विभागाने संपूर्ण विदर्भासाठी यलो अलर्ट जारी केला आहे.
88
एकूण २३ जिल्ह्यांना यलो अलर्ट, नागरिकांनी घ्यावी खबरदारी
राज्यभरात एकूण २३ जिल्ह्यांमध्ये हवामान खात्याने यलो अलर्ट जारी केला आहे. यामध्ये
विदर्भातील सर्व ११ जिल्हे
मराठवाड्यातील ६ जिल्हे
पश्चिम महाराष्ट्रातील ४ जिल्हे
उत्तर महाराष्ट्रातील १ जिल्हा (अहिल्यानगर)
या पार्श्वभूमीवर नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळावा, प्रशासनाच्या सूचना लक्षात घ्याव्यात आणि हवामान अपडेट्सवर सतत लक्ष ठेवावे.