Weather Update: महाराष्ट्रातून नैऋत्य मान्सूनने माघार घेण्यास सुरुवात केली असून, राज्यात कोरडे हवामान, थंडीची चाहूल लागली. हवामान विभागाने पुढील पाच दिवसांचा जिल्हानिहाय अंदाज वर्तवला असून, दिवाळीच्या सुमारास काही भागांत पाऊस पडण्याची शक्यता आहे.
मुंबई: राज्यातून नैऋत्य मान्सूनने काढता पाय घ्यायला सुरुवात केली असून, काही दिवसांत तो संपूर्ण महाराष्ट्रातून माघारी फिरेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. मागील काही दिवसांत पावसाचे प्रमाण घटले असून, राज्यात कोरडे हवामान आणि थंडीची चाहूल जाणवायला लागली आहे.
28
महाराष्ट्रात पुढील पाच दिवस कसे हवामान राहील?
मुंबई आणि कोकण
मुंबई आणि उपनगरांमध्ये ढगाळ हवामान राहण्याची शक्यता आहे.
कमाल तापमान: 34°C
किमान तापमान: 23°C
किमान तापमान घटल्यामुळे थंडीची सौम्य सुरुवात जाणवेल.
रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये तुरळक पावसाचा अंदाज.
उत्तर महाराष्ट्र (नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, अहिल्यानगर)
हवामान: कोरडे आणि सूर्यप्रकाशमय
किमान तापमान: 17°C पर्यंत घसरण
थंडीचा प्रभाव लक्षणीय होणार!
58
मराठवाडा (8 जिल्हे)
छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना, धाराशिव, लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली
16 ऑक्टोबरपर्यंत कोरडे हवामान
त्यानंतर विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस
68
विदर्भ
पुढील 4-5 दिवस कोरडे आणि सूर्यप्रकाशमय
तापमान: कमाल 30°C, किमान 19°C
दिवाळीच्या आसपास पावसाचे संकेत (16 ते 18 ऑक्टोबर दरम्यान)
78
पुढे काय?
नैऋत्य मान्सूनचा प्रभाव संपत असला तरी, ईशान्य मान्सूनचा परिणाम दक्षिण भारतात दिसतो आणि याचा प्रभाव महाराष्ट्रावरही होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. दिवाळीच्या कालावधीत काही भागांत पुन्हा पावसाचे आगमन होऊ शकते.