MHADA Lottery Pune 2025: स्वप्नातील घर आता तुमचं होणार! पुण्यात MHADA ची बंपर लॉटरी सुरू, आजच अर्ज करा

Published : Oct 11, 2025, 04:08 PM IST

MHADA Lottery Pune 2025: पुणे MHADA मंडळातर्फे PM आवास योजनेअंतर्गत तळेगाव दाभाडे येथे अत्यल्प उत्पन्न गटासाठी (EWS) 269 घरांची विक्री सुरू झाली. पहिले येणाऱ्यास पहिले प्राधान्य या तत्त्वावर उपलब्ध असलेल्या घरांची अंतिम किंमत सुमारे ₹18.15 लाख आहे. 

PREV
18
पुणेकरांसाठी घर मिळवण्याची सुवर्णसंधी!

पुणे: पुण्यात स्वतःच्या घराचं स्वप्न पाहणाऱ्यांसाठी मोठी आणि आनंददायक बातमी आहे! MHADA पुणे मंडळ तर्फे प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत तळेगाव दाभाडे परिसरात 269 घरांची विक्री सुरू करण्यात आली आहे. ही घरे अत्यल्प उत्पन्न गटासाठी (EWS) असून, "पहिले येणाऱ्यास पहिले प्राधान्य" या तत्त्वावर दिली जाणार आहेत. 

28
कोणासाठी आहे ही योजना?

तळेगावमध्ये उपलब्ध असलेली ही घरे विशेषतः अत्यल्प उत्पन्न गटातील (EWS) नागरिकांसाठी आहेत. प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ घेणाऱ्यांसाठी ही घरं मोठी संधी ठरू शकतात. 

38
घरांची संख्या आणि वर्गवारी

एकूण उपलब्ध घरांची संख्या – 269

अनुसूचित जातीसाठी – 29

अनुसूचित जमातीसाठी – 29

भटक्या जमातीसाठी – 5

विमुक्त जातीसाठी – 6

सर्वसाधारण प्रवर्गासाठी – 200 घरे

48
घरांचे क्षेत्रफळ आणि किंमत

एकूण क्षेत्रफळ: 48.96 चौ. मी.

चटई क्षेत्रफळ: 30.67 चौ. मी.

मूळ किंमत: ₹20,46,882

सरकारी अनुदानानंतर (केंद्र – ₹1,50,000 व राज्य – ₹1,00,000)

अर्जदाराकडून भरावयाची रक्कम: ₹17,96,882

यासोबत इतर शुल्क (भुईभाडे, कर इ.) ₹18,625 धरून

एकूण अंतिम किंमत: ₹18,15,507

58
अर्ज भरण्याची तारीख आणि वेळ

अर्ज प्रक्रिया सुरू: 10 ऑक्टोबर 2025

अंतिम तारीख: 31 डिसेंबर 2025

वेळ: सकाळी 11 ते संध्याकाळी 5 (सुट्टीचे दिवस वगळून)

अर्ज भरण्याचे ठिकाण:

पुणे गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळ,

गृह निर्माण भवन, आगरकर रोड, पुणे.

अर्ज शुल्क

अर्जाची किंमत: ₹600

GST: ₹108

एकूण अर्ज शुल्क: ₹708

अग्रिम रक्कम (EMD): ₹1,79,688 

68
पात्रतेच्या अटी

अर्जदार हा भारतीय नागरिक असावा.

वार्षिक उत्पन्न 3 लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे.

भारतात अर्जदार किंवा त्याच्या कुटुंबाच्या नावावर पक्के घर नसावे.

प्रधानमंत्री आवास योजनेच्या घटक 3 मध्ये नोंदणी असावी. 

78
ही संधी का खास आहे?

कमी उत्पन्न असलेल्या नागरिकांसाठी आपले स्वतःचे घर मिळवण्याची एकमेव संधी!

सरकारी अनुदानामुळे घरे अधिक परवडणारी

तळेगावसारख्या वेगाने विकसित होणाऱ्या ठिकाणी आपले हक्काचे घर 

88
तुम्ही पात्र असाल तर ही संधी गमावू नका!

तुमच्या स्वप्नातील घरासाठी ही एक खास संधी आहे. पात्र अर्जदारांनी वेळ वाया न घालवता आजच अर्ज भरावा आणि पक्क्या घराच्या दिशेने पहिले पाऊल टाकावे!

RG
About the Author

Rameshwar Gavhane

रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.Read More...
Read more Photos on

Recommended Stories