Maharashtra Weather Alert: हवामान विभागाने महाराष्ट्रातील अनेक भागांत मुसळधार पावसाचा मोठा इशारा दिला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांना यलो अलर्ट दिला असून, नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
मुंबई: भारतीय हवामान विभागाने पुढील काही दिवसांसाठी महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा मोठा इशारा दिला आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि कोकणासह राज्यातील अनेक भागांमध्ये पाऊस कोसळणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
28
कोकण आणि मुंबई परिसर
मुंबई व उपनगरात आकाश ढगाळ राहणार असून काही ठिकाणी मध्यम पावसाची शक्यता वर्तवली आहे. कोकणातील मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि पालघर जिल्ह्यांना हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे, तर सिंधुदुर्गला या अलर्टमधून वगळण्यात आले आहे.
38
पश्चिम महाराष्ट्र
पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर या पाचही जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. जोरदार पावसासोबतच विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे.
नाशिक, अहिल्यानगर, जळगाव, धुळे आणि नंदुरबार या सर्व जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. याठिकाणीही यलो अलर्ट लागू करण्यात आला आहे.
58
मराठवाडा
मराठवाड्यात नांदेड वगळता उर्वरित सर्व जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी झाला आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, लातूर, परभणी आणि हिंगोली येथे जोरदार पाऊस, वीजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्याची शक्यता आहे.
68
विदर्भ
विदर्भातील बुलढाणा, यवतमाळ, वाशिम, वर्धा, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांना हवामान विभागाने मुसळधार पावसाबरोबरच वादळी वाऱ्याचा इशारा दिला आहे.
78
पुढील 24 तास महत्त्वाचे
हवामान विभागाने स्पष्ट केले आहे की पुढील काही दिवस महाराष्ट्राच्या मोठ्या भागात पावसाचा जोर कायम राहील. मात्र, येणारे 24 तास मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रासाठी अधिक निर्णायक ठरणार आहेत.
88
नागरिकांना सूचना
भाविक, शेतकरी आणि सामान्य नागरिकांनी या काळात शेतमाल, जनावरे आणि स्वतःच्या सुरक्षिततेची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. अचानक विजांचा कडकडाट किंवा वादळी वाऱ्यामुळे अडचणी निर्माण होऊ शकतात, त्यामुळे खबरदारी घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे.