अलीकडेच hubcomut.in नावाचे एक फसवे वेबसाईट समोर आले होते, जे गुगलवर KYC माहिती शोधल्यास दिसते. जर कोणी महिला अशा साइटवर आपली माहिती टाकली, तर तिचे बँक खाते तसेच वैयक्तिक माहिती हॅक होऊ शकते. यामुळे खात्यातून पैसे गहाळ होण्याचा आणि सायबर फसवणुकीचा धोका मोठा आहे.
महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले की, ई-केवायसी प्रक्रिया अतिशय सोपी, सुरक्षित आणि पारदर्शक आहे. तसेच महिलांनी वेळेत ई-केवायसी करून घ्यावे, असेही त्यांनी आवाहन केले. यामुळे केवळ या योजनेचा लाभ चालू राहील असे नाही, तर भविष्यातील शासकीय योजनांपर्यंत पोहोच सुलभ होईल.