RSS Centenary Dussehra 2025: RSS आपल्या स्थापनेच्या १००व्या वर्षात पदार्पण करत आहे, ज्याचा प्रारंभ नागपूर येथील पारंपरिक विजयादशमी मेळाव्याने होणार आहे. या ऐतिहासिक सोहळ्याला माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि सरसंघचालक डॉ. मोहन भागवत उपस्थित राहणारय.
नागपूर: राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) यंदा आपल्या स्थापनेच्या शंभराव्या वर्षात पदार्पण करत आहे. या विशेष क्षणाचा प्रारंभ नागपूरच्या पारंपरिक विजयादशमी मेळाव्यापासून होणार आहे. या ऐतिहासिक सोहळ्याला माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
28
100 वर्षांचा प्रवास, आता शताब्दी वर्षाची सुरुवात
1925 साली डॉ. हेडगेवार यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेल्या संघाने आपल्या कार्याने देशभरात व्यापक प्रभाव निर्माण केला आहे. आता या संस्थेचे शताब्दी वर्ष अधिक औपचारिकपणे 2025 च्या विजयादशमीपासून 2026 पर्यंत साजरे करण्यात येणार आहे. या काळात देशभर विविध उपक्रम, संवाद सत्रे, संमेलने आणि सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.
38
यंदाचा दसरा मेळावा का आहे खास?
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांनी याबाबत पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. त्यांच्या मते, यंदाचा मेळावा संघाच्या इतिहासात एक टर्निंग पॉइंट ठरणार आहे. हा कार्यक्रम केवळ धार्मिक किंवा औपचारिक नसून, समाजप्रबोधन, देशभक्ती आणि संघाची भविष्यातली दिशा यावर प्रकाश टाकणारा ठरणार आहे.
२७ सप्टेंबर रोजी, नागपूरमध्ये तीन वेगवेगळ्या ठिकाणांहून पथसंचलन निघणार
सकाळी ७:४५ वाजता व्हेरायटी चौक येथे ही तिन्ही पथसंचलने एकत्र येणार
याठिकाणी सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांचं अवलोकन होणार
पथसंचलनानंतर योगाचे प्रात्यक्षिके सुद्धा सादर केली जातील
58
आंतरराष्ट्रीय उपस्थिती
या विशेष सोहळ्यासाठी घाना, इंडोनेशिया, थायलंड आणि अमेरिका यांसारख्या देशांतील प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. तसेच, बजाज समूहाचे संजीव बजाज आणि इतर नामवंत व्यक्तीही या कार्यक्रमाला हजेरी लावणार आहेत.
68
शताब्दी वर्षाचे कार्यक्रम, देशभरात संघाचा संकल्प
शताब्दी वर्षानिमित्त संघ देशभर "गृहसंपर्क अभियान" राबवणार आहे. याशिवाय
हिंदू संमेलने, युवा संवाद, संवाद सत्रे आयोजित केली जातील
बंगळूर, कोलकाता आणि मुंबई येथे सरसंघचालकांचे विशेष संवाद
देशभर सध्या ८३,०००+ दैनिक शाखा आणि ३२,०००+ साप्ताहिक मिलन सुरू असल्याची माहिती देण्यात आली.
78
शंकर महादेवन यांची खास उपस्थिती
या वर्षीच्या दसरा मेळाव्याला आणखी खास बनवत, प्रसिद्ध गायक शंकर महादेवन हे विशेष गीत सादर करणार आहेत. त्यांच्या आवाजात संघाची प्रेरणादायी गीते कार्यक्रमात ऐकायला मिळणार आहेत.
88
पुढील दिशा, समाजासाठी संघाचे 100 वर्षांचे योगदान
RSS गेली शंभर वर्षे व्यक्तिमत्त्व विकास, सामाजिक समरसता आणि स्वावलंबन यासाठी कार्यरत आहे. संघाच्या कार्याचा मुख्य गाभा म्हणजे समाजातून समाजासाठी कार्य करणारे स्वयंसेवक. याच मूल्यांच्या आधारे पुढील शतकाच्या दिशेने संघ वाटचाल करणार आहे. ऑक्टोबर महिन्यात जबलपूर येथे संघाची कार्यकारी मंडळ बैठक होणार असून, तिथे संघाच्या आगामी योजनांवर चर्चा होणार आहे.