राज्याची परिस्थिती बिकट पण सरकार लक्ष देत नाही, शरद पवार यांनी दुष्काळाच्या मुद्यावरून सरकारवर केली टीका

Published : May 24, 2024, 03:44 PM ISTUpdated : May 24, 2024, 03:45 PM IST
sharad pawar

सार

महाराष्ट्रामध्ये दुष्काळाचा प्रश्न गंभीर असून सरकार या प्रश्नाकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप राष्ट्रवादी नकाँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे. त्यांनी धरणांमध्ये किती पाणीसाठा आहे, याची माहिती दिली आहे. 

महाराष्ट्रातील दुष्काळी परिस्थितीबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवारचे अध्यक्ष शरद पवार यांनी बैठक घेतली आहे. शरद पवार यांनी पाणीटंचाई बिकट असून जलसंकटाची अडचण येणार असल्याची माहिती दिली आहे. सर्वाधिक धरणे सूनही त्यांची अवस्था सध्याच्या घडीला बिकट आहे. यावेळी बोलताना शरद पवार यांनी कोणत्या धरणात किती पाणी आहे याबद्दलची माहिती दिली आहे. 

कोणत्या धरणात किती पाण्याचा साठा - 
संभाजीनगरमध्ये पाणीपातळी 10 टक्के आहे. पुणे विभागात 16 टक्के पाणीसाठा असून नाशिकमध्ये 22 धरणे आहेत. नाशिकमध्ये 22 टक्के तर कोकणात 24 टक्के पाणी असल्याची माहिती शरद पवार यांनी दिली आहे. उजनी धरणात तर शून्य उपयुक्त पाणीसाठा असल्याची माहिती शरद पवार यांनी दिली आहे. त्यांनी जायकवाडी धरणात केवळ 5 टक्के पाणीसाठा असून माजलगाव धरणात शून्य टक्के पाणी असल्याची माहिती दिली आहे. 

धाराशिव जिल्ह्यात नाही पाणीसाठा - 
शरद पवार यांनी पुढे बोलताना धाराशिव जिल्ह्यात पाणीसाठा नसल्याची माहिती दिली आहे. अहमदनगरमध्ये 9 टक्के पाणी साठा असल्याची माहिती दिली आहे. पवार पुढे म्हणतात की, सध्या जरी चांगली परिस्थिती दिसत असली तरी आपल्याला जुलै पर्यंतचा विचार करावा लागणार आहे. जरी पाऊस पडला तरी धरणे भरायला वेळ लागणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. 

छत्रपती संभाजीनगरमध्ये टँकरने पाणी - 
छत्रपती संभाजीनगरमध्ये टँकरने पाणी पुरवठा केला जात असल्याची माहिती दिली आहे. या शहरात 1,867 टँकरने पाणी पुरवठा केला जात असून येथे मराठवाड्यसारखी परिस्थिती उदभवण्याची शक्यता आहे. पाऊस पडायला अजून काही दिवस असताना पाण्याचा वापर हा सुरक्षितपणे करणे आवश्यक असल्याचे त्यांनी म्हटले आहे. राज्यात अनेक ठिकाणी चारा छावण्यांची गरज असताना तेथे त्यांची आवश्यकता आहे. त्यांनी सरकारवर टीका केली आहे. 
आणखी वाचा - 
अल्पवयीन मुलगा नाहीतर ड्रायव्हर चालवत होता गाडी, पोर्शे हिट अँड रन प्रकरणातील आरोपीच्या मित्रांनी केला दावा
Dombivli MIDC Blast: डोंबिवली एमआयडीसीतील एकूण मृतांचा आकडा 11 वर, अजूनही शोधकार्य सुरूच

PREV

Recommended Stories

Nashik Accident News : सप्तश्रृंगी गडाच्या घाटात भीषण अपघात; संरक्षण कठडा तोडून इनोव्हा दरीत कोसळली, पाच जण ठार असल्याची भीती
Adiwasi Land Rules: आदिवासींची जमीन खरेदी-विक्री करता येते का? कायदा नेमकं काय सांगतो? जाणून घ्या महत्वाची माहिती