Maharashtra Rain Update : अरबी समुद्रातील ‘शक्ती’ चक्रीवादळाची तीव्रता कमी होत असून महाराष्ट्राचा धोका टळला आहे. मात्र, कोकणात ९ ऑक्टोबरपर्यंत पावसाचा इशारा कायम आहे. पालघर, ठाणे, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
अरबी समुद्रामध्ये निर्माण झालेल्या ‘शक्ती’ चक्रीवादळाची तीव्रता आज (सोमवार) सकाळपर्यंत कमी होणार असल्याने महाराष्ट्राचा तातडीचा धोका टळला आहे. मात्र, कोकण किनारपट्टीवर ९ ऑक्टोबरपर्यंत पावसाचे चक्र कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
25
पालघर, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्गला ‘यलो अलर्ट’
हवामान खात्याच्या अंदाजानुसार मंगळवारी पालघर आणि ठाणे जिल्ह्यांना, तर गुरुवारी रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. दरम्यान, मुंबईतही या काळात हलक्या ते मध्यम सरींची शक्यता आहे.
35
चक्रीवादळ ‘शक्ती’चे रुपांतर कमी दाबाच्या क्षेत्रात
रविवारी ‘शक्ती’ तीव्र अवस्थेत असले तरी सोमवारी ते पूर्वेकडे सरकणार असून ७ ऑक्टोबरपर्यंत तीव्रता आणखी घटून ते कमी दाबाच्या क्षेत्रात रुपांतरित होईल, असे प्रादेशिक हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. यामुळे राज्यावर थेट परिणाम होण्याची शक्यता नाही.
चक्रीवादळामुळे अरबी समुद्रात उंच लाटा उसळत आहेत. त्यामुळे ६ ते ७ ऑक्टोबरदरम्यान मच्छिमारांनी समुद्रात न जाण्याचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. तसेच सौराष्ट्र आणि कच्छ किनारपट्टीवरही समुद्र खवळलेला राहील.
55
मान्सूनच्या परतीचा प्रवास लवकरच सुरू
परतीचा प्रवास गुजरातपर्यंत येऊन थांबला होता. मात्र, पुढील चार ते पाच दिवसांत मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्राच्या काही भागांतून मान्सून परतण्याची प्रक्रिया पुन्हा सुरू होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.