Maharashtra Rain : महाराष्ट्रात मॉन्सूनच्या परतीदरम्यानही दमदार पाऊस सुरू असून हवामान विभागाने आज (१७ सप्टेंबर) अनेक जिल्ह्यांना येलो अलर्ट दिला आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, अहमदनगर आणि बीडमध्ये जोरदार पावसाचा अंदाज आहे.
मॉन्सूनच्या परतीची वाटचाल सुरू असतानाच, राज्यात दमदार पाऊस कोसळत आहे. आज (ता. १७) राज्यात विजांसह जोरदार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, अहमदनगर आणि बीड जिल्ह्यांत जोरदार पावसाचा अंदाज असल्याने हवामान विभागाने सतर्कतेचा (येलो अलर्ट) इशारा दिला आहे. उर्वरित राज्यात हलक्या पावसाची शक्यता आहे.
26
हवामानातील बदलते चित्र
विदर्भ आणि परिसरावर समुद्र सपाटीपासून ५.८ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती निर्माण झाली आहे. तसेच दक्षिण कर्नाटकपासून कोमोरीन भागापर्यंत दक्षिणोत्तर कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. यामुळे कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अनेक ठिकाणी अतिवृष्टीची नोंद झाली आहे.
36
पावसाची नोंद आणि तापमान
मंगळवारी (ता. १६) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये जालना येथे सर्वाधिक १२० मिलिमीटर पाऊस झाला, तर नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर येथे ११० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. पावसाच्या हजेरीनंतरही काही ठिकाणी उष्णतेचा त्रास कायम आहे. अमरावती येथे राज्यातील उच्चांकी ३३.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.
राज्यात वादळी पावसाला पोषक हवामान असल्याने आज (ता. १७) रत्नागिरी, सिंधुदुर्ग, अहमदनगर, बीड जिल्ह्यांत जोरदार पावसाची शक्यता आहे. तसेच रायगड, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, धाराशिव, लातूर, परभणी, हिंगोली, नांदेड, अमरावती, नागपूर, चंद्रपूर जिल्ह्यांत विजांसह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. उर्वरित राज्यात हलक्या सरींचा अंदाज आहे.
56
मॉन्सूनची माघार
नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) रविवारी (ता. १४) पश्चिम राजस्थानमधून परतीच्या प्रवासाला सुरुवात केली. मंगळवारी (ता. १६) मॉन्सूनने राजस्थानच्या आणखी काही भागांतून, तसेच गुजरात, पंजाब आणि हरियानाच्या काही भागांतून माघार घेतली आहे. सध्या मॉन्सूनच्या परतीची सीमा भटिंडा, फतेहबाद, पिलानी, अजमेर, दिसा आणि भूजपर्यंत पोहोचल्याचे हवामान विभागाने जाहीर केले.
66
हवामान विभागाचा सतर्कतेचा इशारा
जोरदार वादळी पाऊस (येलो अलर्ट) : रत्नागिरी, सिंधुदुर्ग, अहमदनगर, बीड.