Maharashtra Rain Alert : राज्यात २२ ते २५ सप्टेंबरदरम्यान मेघगर्जनेसह वादळी पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. २६ पासून कमी दाबाच्या पट्ट्याचा प्रभाव जाणवणार असून २७ सप्टेंबरला विदर्भ, मराठवाडा, कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार आहे.
राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागानुसार, २२ ते २५ सप्टेंबरदरम्यान राज्यात मेघगर्जनेसह वादळी पाऊस होईल. हा पाऊस मुख्यतः दुपारनंतर पडणार आहे. २६ सप्टेंबरपासून कमी दाबाच्या पट्ट्याचा प्रभाव वाढेल आणि २७ सप्टेंबरला विदर्भ, मराठवाडा, कोकण व मध्य महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये पावसाचे प्रमाण अधिक होण्याची शक्यता आहे.
25
पावसाची तूट आणि अतिरेक
सातारा जिल्ह्यात पावसाची तूट आहे. तर सोलापूर, हिंगोली, धुळे, अमरावती, अकोला आणि गोंदिया या जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे. उलट, काही भागांत मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.
35
मुसळधार पावसाची नोंद
जळगावच्या पाचोरा येथे २४ तासांत १४३ मिमी पाऊस
जेऊर येथे १०५ मिमी, माढा येथे १२० मिमी
छत्रपती संभाजीनगरच्या पैठण येथे तब्बल २०० मिमी
धाराशीवमधील भूम येथे १६७ मिमी पावसाची नोंद
या मुसळधार पावसामुळे ठिकठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे.
१ जून ते २२ सप्टेंबर या कालावधीत राज्यात सरासरी ९५३.२ मिमी पाऊस अपेक्षित असतो. मात्र यावर्षी या कालावधीपर्यंत सरासरीपेक्षा १२ टक्क्यांहून अधिक पाऊस झाला असून राज्याने १ हजार मिमीचा टप्पा ओलांडला आहे. १ ते २२ सप्टेंबर या कालावधीतच पावसाचे प्रमाण ३४ टक्के अधिक नोंदले गेले.
55
जादा पावसाचे जिल्हे
पालघर, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, धाराशीव, लातूर, नांदेड, कोल्हापूर, वर्धा आणि मुंबई उपनगर या जिल्ह्यांमध्ये जूनपासून आत्तापर्यंत सरासरीपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे.