महाराष्ट्र निवडणूक २०२४ : शरद पवारांनी अजित पवारांवर केली जहरी टीका

Published : Oct 29, 2024, 03:46 PM ISTUpdated : Oct 29, 2024, 04:11 PM IST
sharad pawar

सार

बारामती विधानसभा मतदारसंघात अजित पवार यांच्या विरोधात त्यांच्या पुतण्या युगेंद्र पवार यांनी उमेदवारी अर्ज भरल्याने राजकीय वातावरण तापले आहे. शरद पवारांनी अजित पवारांची नक्कल करत प्रचारसभेत रंगत आणली.

आताच्या घडीला महाराष्ट्रातील राजकारण मोठ्या प्रमाणावर ढवळून निघाले आहे. भाऊ भाऊ आणि वडील, मुलगी या नात्यामध्ये मोठ्या प्रमाणावर एकमेकानावर शिंतोडे उडवण्याचे काम करत आहे. बारामती विधानसभा मतदारसंघात अजित पवार यांच्या विरोधात त्यांच्या सख्या भावाच्या मुलाने युगेंद्र पवार यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. त्यामुळे येथील निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर प्रचारात रंगत भरल्याचे दिसून आले आहे. 

अजित पवार यांची शरद पवारांनी केली नक्कल - 
यावेळी सभेत शरद पवार यांनी अजित पवार यांची नक्कल केली आहे. त्यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून यावेळी येथे उपस्थित असणाऱ्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला आहे. यावेळी बोलताना शरद पवार यांनी त्यांची भूमिका मांडली आहे. त्यांनी यावेळी लोक भावना आणि इतर निवडणूक मुद्यांवर निवडणूक लढवण्याचा प्रयत्न केला जाईल. 

यावेळी असणारा प्रश्न हा भावनेचा नसून तो विचारांचा आणि तत्वांचा असल्याचे सांगितले आहे. मी गेल्या चार महिन्यांपासून महाराष्ट्रातील अनेक तालुके फिरलो आहे. आपल्याला महाराष्ट्रातील सत्ता बदलायची आहे. बारामतीच्या जनतेला त्यांनी यावेळी योग्य ऊमेदवार निवडून द्यावा, असाही म्हटल आहे. त्यांनी अजित पवार यांच्यावर टीका केली आहे. 

PREV

Recommended Stories

Nashik Accident News : सप्तश्रृंगी गडाच्या घाटात भीषण अपघात; संरक्षण कठडा तोडून इनोव्हा दरीत कोसळली, पाच जण ठार असल्याची भीती
Adiwasi Land Rules: आदिवासींची जमीन खरेदी-विक्री करता येते का? कायदा नेमकं काय सांगतो? जाणून घ्या महत्वाची माहिती