महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024: रोहित पवारांनी महायुती सरकारवर केला आरोप

रोहित पवार यांनी कर्जत-जामखेडमधून पुन्हा अर्ज भरला असून त्यांची लढत राम शिंदे यांच्याशी होणार आहे. पवार यांनी 'ऍम्ब्युलन्स घोटाळा' नावाची पुस्तिका प्रकाशित करून महायुती सरकारच्या कथित घोटाळ्यांवर प्रकाश टाकला आहे.

vivek panmand | Published : Oct 29, 2024 8:46 AM IST / Updated: Oct 29 2024, 03:00 PM IST

सध्याच्या घडीला महाराष्ट्रात राजकीय वातावरण मोठ्या प्रमाणावर ढवळून निघाले आहे. रोहित पवार यांनी कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघातून परत एकदा अर्ज भरला आहे. त्यांची यावेळी लढत ही राम शिंदे यांच्या सोबत होणार आहे. राम शिंदे यांचा मागील वर्षी रोहित पवार यांनी पराभव केला होता. त्यांनी आक्रमकपणे ५ वर्ष काम केलं आहे 

रोहित पवार यांनी ऍम्ब्युलन्स घोटाळा पुस्तिका केली प्रकाशित - 
रोहित पवार यांनी एक पुस्तिका प्रकाशित केली असून यामध्ये त्यांनी महायुती सर्कारकरने केलेल्या घोटाळ्यांची माहिती दिली आहे.  यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, "राज्यातील दलालखोर सरकारने गेल्या दोन-अडीच वर्षांपासून राज्यात ५० हजार कोटीहून अधिक रुपयांच्या खालेल्ल्या दलालीचा लोकप्रतिनिधी म्हणून सातत्याने पर्दाफाश केला. आज निवडणुकीच्या निमित्ताने या दलालीच्या दलदलीची एक पुस्तिका बनवली असून ती आदरणीय पवार साहेबांच्या हस्ते बारामतीत प्रकाशित करण्यात आली. राज्याला या दलालीच्या दलदलीतून बाहेर काढण्यासाठी ही पुस्तिका प्रत्येक मतदारापर्यंत पोचवून या सरकारला सत्तेबाहेर काढण्याचा आणि राज्याला पुन्हा विकासाच्या शिखरावर नेण्याचा निर्धार करूया!

आजपासून पुढील काही दिवस दररोज या दलालखोरांच्या दलालीचा एकेक अंक मी जनतेच्या माहितीसाठी शेअर करतोय..

आज पहिला अंक - अँब्युलन्स घोटाळ

रोहित पवार हे रोज छापणार एक दिवाळी अंक - 
रोहित पवार हे रोज दिवाळी अंक छापणार असून यामधून महायुती सरकारने केलेला घोटाळा उघडकीस आणणार आहेत. त्यांनी यामधून या घोटाळ्यांच्या संबंधित असणारी सर्व माहिती देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. आता पुढे ते कोणाचे घोटाळे उघडकीस आणतील हे लवकरच दिसून येईल. 

Read more Articles on
Share this article