महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024: शरद पवारांच्या पक्षाने मोहोळची बदलली उमेदवारी

Published : Oct 29, 2024, 12:46 PM ISTUpdated : Oct 29, 2024, 03:16 PM IST
Sharad Pawar Party New Symbol by EC

सार

Sharad Pawar NCP Candidate List : विधासभा निवडणुकीसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदावारांची पाचवी लिस्ट जाहीर करण्यात आली आहे. खरंतर, राष्ट्रवादी काँग्रेसकडून जोरदार शक्तिप्रदर्शन केले जात आहे.

Sharad Pawar NCP Candidate List : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची राज्यात मोठी धूम दिसत आहे. वेगवेगळ्या राजकीय पक्षांकडून आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केली जात आहे. आज (29 ऑक्टोबर) विधानसभा निवडणुकीसाठी उमेदावारांनी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे. अशातच शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारांची पाचवी लिस्ट जारी करण्यात आली आहे. या लिस्टमध्ये 5 उमेदवारांची नावे आहेत.

पक्षाकडून उमेदवारांची लिस्ट
शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून 24 ऑक्टोबरला 45 उमेदवारांची पहिली लिस्ट जारी करण्यात आली होती. यानंतर 26 ऑक्टोबरला दुसरी, तिसरी यादी 27 ऑक्टोबरला 9 उमेदवारांची यादी आणि 28 ऑक्टोबरला सात उमेदवारांची यादी जारी करण्यात आली होती.

कटोल येथून अनिल देशमुखांच्या मुलाला उमेदवारी
महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना आधी उमेदवारी देण्यात आली होती. पण यामध्ये बदल करत पक्षाने अनिल देशमुख यांचा मुलगा सलील देशमुखला उमेदवारी दिली आहे. शरद पवारांच्या गटाकडून जाहीर करण्यात आलेल्या ज्या 7 जागांवर घोषणा करण्यात आली होती त्यामध्ये माण येथून प्रभारक घार्ग, कटोल येथून सलील देशमुख, खानापूर येथून वैभव पाटील, वाई येथून अरूणादेवी पिसाट्ठ, दौंड येथून रमेश थोरात, पुसद येथून शरद मैंद आणि सिंदखेड येथून संदीप बेडसे यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे.

शरद पवार यांच्या पक्षाने मोहोळ येथून उमेदवार बदलण्यात आला आहे. राजू खरे यांना येथून तिकीट दिले असून त्यांची लढत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांच्याकडून यशवंत माने यांना तिकीट देण्यात आलं आहे. 

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचे शेड्यूल

  • निवडणुकीची अधिसूचना जारी होण्याची तारीख : 22.10.2024
  • अर्ज भरण्याची अखेरची तारीख : 29.10.2024
  • अर्ज पडताळणीची तारीख : 30.10.2024
  • उमेदवारांना अर्ज मागे घेण्याची तारीख : 04.10.2024
  • मतदानाची तारीख : 20.11.2024
  • मतदानाच्या निकालाची तारीख : 23.11.2024

आणखी वाचा : 

महाराष्ट्र निवडणुकीत भाजपच्या तिसऱ्या यादीत 25 नावे: 146 उमेदवारांची केली घोषणा

Maharashtra Election 2024: ओवेसींचा पक्ष AIMIM चे गाणे व्हायरल

PREV

Recommended Stories

आजपासून विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन, पहिल्याच दिवशी 4 मोठे मोर्चे, 4 आत्महत्यांचे गंभीर इशारे, 15 धरणे आंदोलन, 9 उपोषणे
Winter Session Nagpur 2025 : हिवाळी अधिवेशनात IAS तुकाराम मुंढे यांच्या निलंबनाची BJP करणार मागणी, ‘स्मार्ट सिटी’ प्रकरण पुन्हा ऐरणीवर