Lok Sabha Election 2024 : 'आम्ही राज्यात 45 पेक्षा अधिक जागा जिंकणार', उदय सामंत यांचा दावा

Published : Apr 03, 2024, 12:15 PM ISTUpdated : Apr 03, 2024, 12:19 PM IST
Maharashtra Minister Uday Samant

सार

लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजल्यानंतर राजकीय पक्षांकडून जोरदार तयारी सुरू करण्यात आली आहे. अशातच मंत्री उदय सामंत यांनी यंदाच्या निवडणुकीत आम्ही राज्यात 45 च्या पार जाऊ असा दावा केला आहे.

Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीसाठी एनडीएमधील (NDA) जागा वाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Cm Eknath Shinde) यांच्या शिवसेनेच्या (Shiv Sena) उमेदवारांची पहिली यादी जारी करण्यात आली आहे. दुसऱ्या बाजूला एनडीला (NDA) महाराष्ट्रात मोठा विजय मिळू शकतो अशा चर्चाही केल्या जात आहेत. अशातच मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी एक विधान केले आहे. उदय सामंत यांनी राज्यात आम्ही 45 च्या पार जाऊ असे म्हटले आहे.

उदय सामंत नक्की काय म्हणाले?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटातील नेते आणि मंत्री उदय सामंत यांनी लोकसभा निवडणुकीसंदर्भात एक दावा केला आहे. उदय सामंत यांनी म्हटले की, “राज्यात भलेही विरोध निवडणूक लढवत आहेत. पण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Deputy CM Devendra Fadnavis) यांनी 45 जागा जिंकण्याचा जो संकल्प केलाय तो पूर्ण होईल.”

रत्नागिरी- सिंधुदुर्ग मतदारसंघात महायुतीची बैठक
रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात बुधवारी (3 मार्च) महायुतीची बैठक होणार आहे. या बैठकीला केंद्रीय मंत्री नारायण राणे, रवींद्र चव्हाण, दीपक केसरकर, उदय सामंत, किरण सामंत, नितेश राणे आणि निलेश राणे उपस्थितीत लावणार आहेत.

एनडीएकडून 33 उमेदवारांच्या नावाची घोषणा
महाराष्ट्रातील 48 लोकसभेच्या जागांवर पाच टप्प्यात निवडणूक होणार आहे. यंदा एनडीएमध्ये (NDA) भाजप, एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा समावेश आहे. एनडीएने आतापर्यंत 48 पैकी 33 जागांवरील उमेदवारांच्या नावाची घोषणा केली आहे.

आणखी वाचा : 

Lok Sabha Election 2024 : जळगावचे खासदार उन्मेश पाटील आज शिवबंधन बांधणार, भाजपला सोडचिठ्ठी देण्यामागील हे आहे कारण

Lok Sabha Election 2024 : शरद पवारांच्या गटातील उमेदवारांची आज दुसरी यादी जाहीर होण्याची शक्यता

हिंगोली लोकसभेचे हेमंत पाटलांच शिवसेना कापणार तिकीट, संतोष बांगर राहणार आगामी उमेदवार?

PREV

Recommended Stories

महाराष्ट्रात 'थंडीचा कहर'! तापमान 'मायनस'मध्ये जाणार; 'या' ३ जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट, तुमच्या शहराचं तापमान तपासा!
मोठी बातमी! नवी मुंबईकरांसाठी 'जॅकपॉट'! तुमच्या प्रवासात होणार 'हा' सर्वात मोठा बदल; दोन नवीन रेल्वे स्थानकांची घोषणा!