भाजपला महाराष्ट्रात झटका बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. खरंतर, तिकीट कापल्याने नाराज असलेले उन्मेश पाटील उद्धव ठाकरेंच्या गटात प्रवेश करणार असल्याची माहिती संजय राऊत यांनी दिली आहे.
Lok Sabha Election 2024 : जळगाव (Jalgaon) येथून भाजपचे खासदार असलेले उन्मेश पाटील (Unmesh Patil) पक्षाला धक्का देण्याची शक्यता आहे. खरंतर, उन्मेश पाटील यांना यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भाजपने तिकीट नाकारले आहे. अशातच उद्धव ठाकरे यांच्या गटात (UBT Shiv Sena) उन्मेश पाटील प्रवेश करणार असल्याची माहिती खासदार संजय राऊत यांनी दिली आहे.
उन्मेश पाटील यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची मातोश्रीवर भेटही घेतली. याआधी उन्मेश पाटील खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना भेटले होते. असे म्हटले जातेय की, पक्षाअंतर्गत वादामुळे भाजपने उन्मेश पाटील यांचे तिकीट कापले आहे. यामुळे जळगाव येथून स्मिता वाघ यांना भाजपकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आले आहे.
उन्मेश पाटील गेल्याने भाजपला महाराष्ट्रात धक्का बसणार
उन्मेश पाटील यांनी शिवबंधन बांधल्यास उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना गटाला भाजपच्या (BJP) विरोधात एक मजबूत उमेदवार मिळेल. याशिवाय भाजपला जळगावात उन्मेश पाटील यांच्या जाण्याने धक्का बसणार आहे. बुधवारी (3 मार्च) उन्मेश पाटील हातात शिवबंधन बांधणार आहेत.
एनडीएकडून 33 उमेदवारांच्या नावाची घोषणा
महाराष्ट्रातील 48 लोकसभेच्या जागांवर पाच टप्प्यात निवडणूक होणार आहे. यंदा एनडीएमध्ये (NDA) भाजप, एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा समावेश आहे. दरम्यान, एनडीएमध्ये जागा वाटपाचा तिढा कायम आहे. एनडीएने आतापर्यंत 48 पैकी 33 जागांवरील उमेदवारांच्या नावाची घोषणा केली आहे.
इंडिया आघाडीतही जागा वाटपाचा तिढा कायम
महाराष्ट्रात पहिल्यात टप्प्यातील मतदान 19 एप्रिलला होणार आहे. तरीही अद्याप इंडिया आघाडीतील (INDIA Alliance) जागा वाटपाचा तिढा सुटलेला नाही. इंडिया आघाडीमध्ये काँग्रेस, उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि शरद पवारांचा गट यांच्यामध्ये जागा वाटपावरून अजूनही चर्चा सुरू आहे. दरम्यान, असे मानले जातेय 48 जागांपैकी सर्वाधिक जागा उद्धव ठाकरे यांच्या खात्यात जाऊ शकतात.
सात टप्प्यात होणार निवडणूक
देशभरात सात टप्प्यात निवडणूक होणार आहे. पहिल्या टप्प्यातील निवडणुकीसाठी 19 एप्रिलला मतदान होणार आहे. यानंतर 26 एप्रिल, 7 मे, 13 मे, 20 मे, 25 मे आणि 1 जूनला मतदान होणार आहे. मतदानाचे निकाल 4 जूनला जाहीर केले जाणार आहेत.
आणखी वाचा :
Lok Sabha Election 2024 : शरद पवारांच्या गटातील उमेदवारांची आज दुसरी यादी जाहीर होण्याची शक्यता