Lok Sabha Election 2024 : शरद पवारांच्या गटातील उमेदवारांची आज दुसरी यादी जाहीर होण्याची शक्यता

Published : Apr 03, 2024, 08:53 AM ISTUpdated : Apr 03, 2024, 08:56 AM IST
sharad pawar

सार

लोकसभा निवडणुकीसाठी शरद पवार यांच्या गटाच्या उमेदवारांची आज दुसरी यादी जाहीर होण्याची शक्यता आहे. दुसऱ्या यादीत पाच जागांच्या उमेदवारांच्या नावाची घोषणा प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडून केली जाणार असल्याचे बोलले जात आहे.

Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीसाठी राजकीय पक्षांकडून जोरदार तयारी करण्यात आली आहे. याशिवाय राजकीय पक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरवलेल्या उमेदवारांच्या नावाचीही घोषणा करत आहेत. अशातच नुकतीच शरद पवार यांचा पक्ष ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष- शरदचंद्र पवार’ (Nationalist Congress Party-Shardchandra Pawar) यांच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली. बुधवारी (3 मार्च) शरद पवारांच्या गटाची दुसरी यादी जाहीर होण्याची शक्यता आहे.

पाच जागांसाठी उमेदवारांची यादी जाहीर होणार
शरद पवारांच्या दुसऱ्या यादीमध्ये पाच जागांसाठी उमेदवारांच्या नावाची घोषणा केली जाणार आहे. यामध्ये भिवंडी (Bhiwandi), सातारा (Satara), रावेर (Raver), माढा (Madha) आणि बीडच्या (Beed) जागांचा समावेश आहे.दरम्यान, सातारा येथू श्रीवनिवास पाटील यांनी लढण्यास नकार दिला आहे. यासंदर्भात शरद पवारांनाही कळवण्यात आले आहे. पण पक्षातील वरिष्ठ नेत्यांकडून श्रीनिवास पाटील यांनीच सातारा मतदारसंघातून निवडणूक लढवावी असा आग्रह करण्यात येत आहे. अशातच आता दुसऱ्या यादीत कोणत्या उमेदवारांना संधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

पहिल्या यादीत कोणाला मिळालीय संधी?
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष- शरदचंद्र पवार यांच्या पक्षाच्या पहिल्या यादीमध्ये पाच मतदारसंघाच्या जागांवर उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये वर्धा येथून अमर काळे, दिंडोरी येथून भास्करराव भगरे, बारामती येथून सुप्रिया सुळे, शिरूर येथून डॉ. अमोल कोल्हे आणि अहमनदर येथून निलेश लंके यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आले आहे.

आणखी वाचा : 

हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून निवेदिता माने उभ्या राहणार? राजू शेट्टींच्या विरोधात होणार लढत

हिंगोली लोकसभेचे हेमंत पाटलांच शिवसेना कापणार तिकीट, संतोष बांगर राहणार आगामी उमेदवार?

'निवडणुकीत विजय झाल्यास व्हिस्की अन् बिअर देणार...',चिमूरच्या वनिता राऊत यांचे मतदारांना विचित्र आश्वासन

PREV
Maharashtra News (महाराष्ट्र बातम्या): Read Maharashtra LIVE Updates and Latest Marathi News Today. Check महाराष्ट्र राजकीय बातम्या, महाराष्ट्र क्राईम न्यूज, महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज. Watch Maharashtra Viral News Videos, Photos, Maharashtra Weather Updates in Marathi at Asianet Marathi News.

Recommended Stories

Viral Video : भिवंडीत गुलाबजामच्या पाकात सापडला उंदीर, व्हिडिओ व्हायरल
Narendra Modi : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून मोदींच्या २५ वर्षांच्या कारकिर्दीचं कौतुक