Lok Sabha Election 2024 : ठाकरे गटातील उमेदवारांची पहिली यादी जाहीर, समोर आली ही नावे

लोकसभा निवडणुकीसाठी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. खासदार संजय राऊत यांनी ट्विट करत उमेदवारांची यादी जारी केलीय.

Lok Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. पक्षाने बुधवारी (27 मार्च) लोकसभा निवडणुकीसाठी 17 उमेदवारांच्या नावाची घोषणा करत यादी जाहीर केली आहे. उद्धव ठाकरे यांच्या गटातील अनिल देसाई यांना मुंबई दक्षिण-मध्य जागेवरून तिकीट दिले आहे. याशिवाय पक्षाने मुंबई दक्षिण येथून अरविंद सावंत यांना उमेदवारी दिली आहे.

या उमेदवारांना दिलीय तिकीट
शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सोशल मीडियावरील प्लॅटफॉर्म X वर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये ठाकरे गटाच्या उमेदवारांची यादी जाहीर केली आहे.

26 मार्चला जाहीर केली जाणार होती यादी
संजय राऊत यांनी म्हटले होते की, उद्धव ठाकरेंच्या शिवसेना गटाची पहिली यादी 26 मार्चला जारी केली जाईल. यावेळी आम्ही 15-16 जागांसाठी उमेदवारांच्या नावांची घोषणा करू. दरम्यान, 26 मार्चला उमेदवारांची यादी जारी केली नाही. पण आज पक्षाने उमेदवारांची अखेर पहिली यादी जाहीर केली आहे. महाविकास आघाडीमधील शरद पवारांच्या पक्षाने अद्याप आपली उमेदवारांची यादी जाहीर केलेली नाही. याशिवाय काँग्रेसने काही जागांवरील आपल्या उमेदवारांची घोषणा केली आहे.

आणखी वाचा : 

Lok Sabha Election 2024 : महाविकास आघाडीतील जागा वाटपाच्या घोषणेआधी काँग्रेसचा मोठा निर्णय, सांगली येथून विशाल पाटील यांना उतरवण्याचा निर्णय

Lok Sabha Election 2024 : सुप्रिया सुळे यांचा दौंड ते यवतपर्यंत लोकल ट्रेनने प्रवास, जाणून घेतल्या प्रवाशांच्या समस्या

लोकसभा निवडणुकीआधी राज ठाकरे दिल्लीत दाखल, NDA मध्ये सहभागी होण्याच्या चर्चांना उधाण

Read more Articles on
Share this article