'निवडणुकीत विजय झाल्यास व्हिस्की अन् बिअर देणार...',चिमूरच्या वनिता राऊत यांचे मतदारांना विचित्र आश्वासन

चंद्रपुर येथील चिमूर गावातील अपक्ष उमेदवार वनिता राऊत यांनी निवडणुकीत विजय झाल्यास दारिद्र्य रेषेखालील नागरिकांना व्हिस्की आणि बिअर देणार असल्याचे विचित्र आश्वासन दिले आहे. याचीच चर्चा सध्या जोरदार सुरू आहे.

Chanda Mandavkar | Published : Apr 1, 2024 6:12 AM IST / Updated: Apr 01 2024, 11:43 AM IST

Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीच्या मतदानासाठी अवघे काही दिवसच शिल्लक राहिले आहेत. अशातच निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या उमेदवारांकडून मतदारांना वेगवेगळी आश्वासने देत आपल्या खात्यात मदतान करण्याचे आवाहन केले जात आहे. अशातच चंद्रपूर (Chandrapur) येथील चिमूरमधील (Chimur) उमेदवार वनिता जितेंद्र राऊत (Vanita Raut) यांनी निवडणुकीत विजय झाल्यास मतदारांना व्हिस्की आणि बिअर देण्याचे आश्वासन दिले आहे. वनिता राऊत यांच्या आश्वासनाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.

वनिता राऊत यांनी दारिद्र्य रेषेखालील मतदारांनी आपल्याला निवडणुकीत मतदान करावे म्हणून म्हटलेय की, प्रत्येक गावात बिअर बार सुरू करणारच. याशिवाय खासदार निधीतून स्वस्त व्हिस्की आणि बिअरही दिल्या जातील.

जेथे गाव, तेथे बिअर बार
वनिता राऊत चिमूर येथून लोकसभेच्या जागेवर उभ्या आहेत. मतदारांनी भरघोस मतांनी विजयी करण्यासाठी वनिता राऊत यांनी दारिद्र्य रेषेखालील मतदारांना आश्वासन देत म्हटले की, जेथे गाव तेथे बिअर बार सुरू करणार. हेच माझे मुद्दे आहेत. याशिवाय मद्यप्राशन करणाऱ्या व्यक्तीसह मद्य विक्री करणाऱ्यांकडे परवाना असणे गरजेचे आहे. बेरोजगारांना बिअर बारचे परवानहे देऊ असेही वनिता राऊत यांनी म्हटले आहे.

याआधीही वनिता यांनी लढवलीय निवडणूक
वनिता राऊत यांनी याआधीही निवडणूक लढवली आहे. वर्ष 2019 मध्ये लोकसभेवेळी नागपूर येथून वनिता राऊत निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या होत्या. याशिवाय विधानसभेची निवडणूक वनिता राऊत यांनी चिमूर येथून लढली होती. दोन्ही वेळेस वनिता राऊत यांचे डिपॉझिच जप्त करण्यात आले होते. खरंतर, त्यावेळीही वनिता राऊत यांनी दारुबंदी उठवून दारूची दुकाने सुरू करावीत अशी मागणी केली होती.

आणखी वाचा :

Lok Sabha Election 2024 : महाराष्ट्रात भाजपला 41 पेक्षा अधिक जागांवर विजय मिळेल, अमित शाह यांचा दावा

Lok Sabha Election 2024 : काँग्रेसकडून राज्यातील 18 जागांसाठी या उमेदवारांचा विचार, आज शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यासोबत बैठक

Lok Sabha Election 2024 : सुप्रिया सुळे यांचा दौंड ते यवतपर्यंत लोकल ट्रेनने प्रवास, जाणून घेतल्या प्रवाशांच्या समस्या

Read more Articles on
Share this article