पुण्यातील मानाच्या पाच गणपतींच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना कधी होणार आहे याची माहिती जाणून घ्या. कसबा गणपती, तांबडी जोगेश्वरी, गुरुजी तालीम, तुळशीबाग आणि केसरीवाडा गणपतींच्या मिरवणुकांची वेळ आणि प्राणप्रतिष्ठापनेची वेळ या लेखात वाचा.
Pune Ganpati: पुण्यातील मानाचे ५ गणपती कधी करणार मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना, जाणून घ्या माहिती
सकाळी ९ वाजता या पाच मंडळांची मिरवणूक सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, कसबा गणपती प्रथम, त्यानंतर तांबडी जोगेश्वरी, गुरुजी तालीम, तुळशीबाग आणि केसरीवाडा गणपती यांचा क्रम असा राहील.
26
मानाचा पहिला कसबा गणपती
मानाचा पहिला गणपती कसबा गणपतीची मिरवणूक सकाळी ८ वाजता सुरु होईल. या मिरवणुकीमध्ये प्रभात बँड पथकासोबत ढोल-ताशा पथकासोबत ढोल ताशा पथकही वादन करणार आहे. त्यानंतर सकाळी गणपतीची प्रतिष्ठापना करणार आहे.
36
मानाचा दुसरा गणपती तांबडी जोगेश्वरी मंडळी
यंदाचे तांबडी जोगेश्वरी मंडळीचे १३३वे वर्ष आहे. या सकाळी गणपतीची मिरवणूक सकाळी १०वाजता निघणार आहे. यंदा साडेतीन शक्तिपीठांपैकी एक पहिल्या प्रतिकृतीची कोल्हापूर मंडळाची महालक्ष्मी मंडळाकडून साकारण्यात आली आहे.
46
मानाचा तिसरा गणपती गुरुजी तालीम मंडळ
मानाचा तिसरा गणपती गुरुजी तालीम मंडळाचे यावर्षी १३९वे वर्ष आहे. बाप्पाच्या आगमनाची मिरवणूक ११ वाजता सुरु होणार आहे. प्रतिष्ठापना दुपारी २:३५ वाजता होणार आहे.
56
मानाचा चौथा गणपती तुळशीबाग गणपती मंडळ
यंदा तुळशीबाग गणपती मंडळ रौप्य महोत्सवी वर्ष साजरा केला जात आहे. बुधवारी सकाळी ११ वाजता मिरवणुकीला सुरुवात होणार असून प्राणप्रतिष्ठापना २:३५ वाजता होणार आहे.
66
मानाचा पाचवा गणपती केसरीवाडा
सकाळी ९ वाजता गणपती केसरीवाडा गणपतीची मिरवणूक सुरु होणार आहे. सकाळी ११ वाजता येथील गणपतीच्या महाआरतीला सुरुवात होणार आहे.