ज्योती मल्होत्राने ‘लालबागच्या राजाच्या’ गर्दीचे काढले होते व्हिडीओ; चौकशीदरम्यान चारवेळा मुंबई दौऱ्याचं उघड

Published : May 22, 2025, 12:33 PM IST
Jyoti Malhotra

सार

पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपांखाली अटकेत असलेली युट्युबर ज्योती मल्होत्रा हिच्याविरोधात रोज नवे धक्कादायक खुलासे होत आहेत. 

Jyoti Malhotra Spy Case : पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपांखाली अटकेत असलेली युट्युबर ज्योती मल्होत्रा हिच्याविरोधात रोज नवे धक्कादायक पुरावे समोर येत आहेत. तपास यंत्रणांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ज्योतीने आयएसआयशी संबंधांची कबुली दिली असून ती चार वेळा मुंबई दौऱ्यावर गेल्याचं उघड झालं आहे.

मुंबईत लालबागच्या राजाचा व्हिडीओ बनवला
 २०२३ मध्ये लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी आलेल्या गर्दीचा व्हिडीओ तिने शूट केला होता. तसेच मुंबईतील विविध ठिकाणचे फोटो आणि व्हिडीओ तिने काढून डिलीट केले होते. मात्र फॉरेन्सिक तपासात हे फोटो आणि व्हिडीओ पुन्हा रिकव्हर करण्यात आले आहेत. २०२४ मध्ये तिने तीन वेळा आणि २०२३ मध्ये एकदा मुंबईत भेट दिली होती. तिच्या या दौऱ्यांचे आता सखोल विश्लेषण सुरू आहे.

कबुलीपत्रात उघड झालेली गुप्त माहितीची देवाणघेवाण
 तपासात ज्योतीने सांगितले की, पाकिस्तानात अली हसनने तिची ओळख आयएसआयच्या अधिकाऱ्यांशी करून दिली होती. तिने शाकीर, राणा शाहबाज यांच्याशी थेट भेट घेतली होती. शाकीरचा मोबाईल क्रमांक ‘जट रंधावा’ या नावाने तिच्या फोनमध्ये सेव्ह होता. त्याच्याशी चॅटद्वारे देशविरोधी माहितीची देवाणघेवाण केल्याचं तिने मान्य केलं आहे.

तिने दानिशच्या मदतीने पाकिस्तानच्या दोन फेऱ्या मारल्या. यावेळी ती व्हॉट्सअ‍ॅप, स्नॅपचॅट आणि टेलिग्रामसारख्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म्सचा वापर करून देशविरोधी माहिती पोहोचवत होती. दिल्लीतील पाकिस्तान उच्चायुक्तालयात दानिश या अधिकाऱ्याला तिने अनेकदा भेटल्याची माहितीही तिच्या कबुलीपत्रात आहे.

कोर्टात हजर, पोलिस कोठडी वाढण्याची शक्यता
 पोलिस कोठडी संपल्यानंतर ज्योती मल्होत्राला आज हिसार कोर्टात हजर करण्यात येणार आहे. तिला पुन्हा पोलिस कोठडीत ठेवण्याची मागणी करण्यात येणार आहे. तपासादरम्यान पोलिसांनी तिच्याकडून ३ मोबाईल फोन, एक लॅपटॉप आणि काही इतर इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस जप्त केली आहेत, ज्यांची फॉरेन्सिक तपासणी सुरू आहे. तिची ४ बँक खाती देखील चौकशीच्या धर्तीवर आहेत.ज्योतीच्या वडिलांनी निवेदनात म्हटलं आहे की, "आमच्याकडे वकील करण्यासाठी पैसे नाहीत, त्यामुळे सरकारने वकील उपलब्ध करून द्यावा."

कोण आहे ज्योती मल्होत्रा? 
ज्योती मल्होत्रा ही सामान्य कुटुंबातील मुलगी आहे. लक्झरी आयुष्य जगण्याच्या हव्यासामुळे तिने देशद्रोहाचा मार्ग स्वीकारला, अशी माहिती समोर येत आहे. वडिलांसोबत एका लहानशा घरात राहणाऱ्या ज्योतीने उच्च माध्यमिक शिक्षणानंतर नोकरी शोधण्यास सुरुवात केली होती. १४ वर्षांपूर्वी तिने कोचिंग इन्स्टिट्यूटमध्ये रिसेप्शनिस्ट म्हणून पहिली नोकरी केली.

त्यानंतर ती हिसारपासून २० किमी अंतरावर असलेल्या खाजगी शाळेत शिक्षिका म्हणून रुजू झाली, पण फार काळ टिकली नाही. नंतर एका खाजगी कार्यालयात रिसेप्शनिस्ट म्हणून काम सुरू केलं. सतत नोकऱ्या बदलत राहण्याच्या प्रवासात, ती तिच्या महत्त्वाकांक्षेच्या आहारी गेली आणि गुप्तहेरगिरीच्या दलदलीत अडकली.

PREV
Read more Articles on

Recommended Stories

ST Bus Fare Hike : प्रवाशांना महागात बसणार एसटीचा प्रवास! लालपरीपासून शिवनेरीपर्यंत वाढले तिकीट दर
पुणे रेल्वे प्रवाशांसाठी मोठी बातमी! १० दिवसांचा ‘मेगाब्लॉक’; अमरावती-नागपूरसह ११ गाड्या रद्द