Monsoon Update : पुण्यात मे महिन्यात विक्रमी पाऊस, दहा वर्षांपूर्वीचा रेकॉर्ड ब्रेक

Published : May 22, 2025, 11:35 AM IST
Severe waterlogging in Bengaluru after incessant rainfall

सार

Pune Monsoon : पुण्यात झालेल्या अति मुसळधार पावसाने गेल्या दहा वर्षांचा रेकॉर्ड ब्रेक केला आहे. पुण्यामधील पावसाची सरासरी नोंद 31.4 मिमी केली जाते. पण यंदा तिप्पटीहून अधिक पाऊस पडला गेला. 

Pune Monsoon : पुण्यात यंदाच्या मे महिन्यात पडलेल्या पावसाने दहा वर्षांपूर्वीचा विक्रम मोडत नवा उच्चांक गाठला आहे. १ मे ते २१ मे या काळात पुण्यात एकूण ११० मिमी पावसाची नोंद झाली असून, याआधी २०१५ मध्ये मे महिन्यात १०६ मिमी पावसाची नोंद झाली होती. पुण्यात मे महिन्याची सरासरी पावसाची नोंद केवळ ३१.४ मिमी असते, त्यामानाने यंदा तीनपटहून अधिक पावसाची नोंद झाली आहे.

चिंचवड आणि एनडीए परिसरातही विक्रमी पाऊस मंगळवारी शिवाजीनगरमध्ये २४ तासांत ४०.५ मिमी पाऊस पडला. चिंचवडमध्ये एका रात्रीत १०१ मिमी पावसाची नोंद झाली. एनडीए परिसरातही शंभरी पार झाल्यामुळे पावसाचे प्रमाण लक्षवेधी ठरले. पुढील काही दिवस पाऊस सक्रिय राहण्याची शक्यता असल्यामुळे हा आकडा आणखी वाढू शकतो.

पावसामागचं कारण – अरबी समुद्रात कमी दाबाचं क्षेत्र कर्नाटकच्या किनारपट्टीलगत अरबी समुद्रात कमी दाबाचं क्षेत्र तयार झाल्यामुळे हवेत बाष्पाचे प्रमाण वाढले आहे. हे बाष्प जमीनकडे येत असून त्याचा परिणाम म्हणून मध्य महाराष्ट्र व कोकणात मेघगर्जनेसह पावसाचं आगमन झालं आहे. पुण्यातही याच कारणामुळे जोरदार पावसाने हजेरी लावली.

पुणे शहरात रात्रभर पावसाचा कहर बुधवारी दिवसभर वातावरणात उकाडा होता, मात्र रात्री आठनंतर बावधन, बाणेर, कोथरूड, सिंहगड रस्ता, कात्रज, आंबेगाव, सहकारनगर परिसरात पावसाने जोरदार आगमन केलं. काही ठिकाणी हलकासा तर काही भागात मध्यम ते मुसळधार पाऊस झाला. नरवीर तानाजी मालुसरे रस्त्यावर जोरदार सरी कोसळल्या. ढगांचा गडगडाट आणि विजांचा कडकडाट देखील अनुभवास आला.

पुढील चार दिवस पाऊस कायम राहणार हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील चार दिवस पावसाचा मुक्काम पुण्यात कायम राहणार आहे. आज, गुरुवारी आकाश ढगाळ राहील, विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यांसह मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे.

नागरिकांनी हवामान खात्याच्या इशाऱ्याकडे लक्ष द्यावं आणि सुरक्षित राहावं, असा सल्ला प्रशासनाकडून देण्यात आला आहे.

PREV
Read more Articles on

Recommended Stories

Maharashtra Weather Alert : थंडीचा हाहाकार! महाराष्ट्रात बुधवारी कोल्ड वेव्हचं महासंकट! या 11 जिल्ह्यांना 'अलर्ट'
शेतकऱ्यांसाठी गुडन्यूज! 'जिवंत सातबारा मोहीम' म्हणजे काय? तुमची अडचण कायमची कशी दूर होईल, पाहा!