
Maharashtra : जळगावमधील भडगाव तालुक्यामधील वाक येथे मध्यरात्री तिघांवर तालवारीने वार करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. खरंतर, कारधून आलेल्या चार अज्ञातांनी तिघांवर जीवघेणा हल्ला केला. यामध्ये तिघेही गंभीर जखमी झाल्याचे वृत्त आहे.
प्राप्त झालेल्या माहितीनुसार, वाक येथील राकेश पाटील त्यांच्या घरासमोर उभे होते. यावेळी कारमधून योगेशने राकेशला धडक दिली. यानंतर आरोपीने कारमधून खाली येत राकेश यांच्यावर हल्ला केला. एवढेच नव्हे राकेश यांच्या वडील आणि काकांवरही तलवारीने वार केले.
उमेश नावाच्या व्यक्तीने लाकडाच्या दांडुक्याने त्यांना मारहाण केली. यावेळी आरोपींनी जोरात ओरडत म्हटले की, यांना सोडू नका, कापून टाका. यामध्ये राकेश पाटील यांच्यासह दोनजण जखमी झाले आहेत. सध्या जखमींवर उपचार सुरू आहेत. पोलिसांनाघटनेची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक ठिकाणचा पंचनामा केला.