बंडखोर खासदारांना उपमुख्यमंत्री शिंदे यांच्याकडून मिळणार मोठं गिफ्ट, निधी तातडीने होणार जमा

Published : Jun 23, 2026, 06:59 PM IST
Deputy CM Eknath Shinde

सार

उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील सहा खासदारांनी बंड करून एकनाथ शिंदे यांच्या गटात प्रवेश केला आहे. मतदारसंघातील रखडलेला विकास आणि अपुऱ्या निधीमुळे हा निर्णय घेतल्याचे या खासदारांनी सांगितले असून, शिंदे यांनी त्यांना भरघोस निधी देण्याचे आश्वासन दिले आहे.

ठाकरे यांच्या शिवसेनेतील ६ खासदारांनी बंड करून शिंदे गटात प्रवेश केला. त्यानंतर खऱ्या अर्थाने महाराष्ट्रातील राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. त्यांचा सर्वांचा पक्षप्रवेश कार्यक्रम घेण्यात आला. त्यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उपस्थित होते. मतदारसंघाचा रखडलेला विकास आणि अपुरा निधी यामुळं आम्ही पक्षप्रवेश करत असल्याचं या ६ खासदारांनी सांगितलं आहे.

खासदारांना मिळणार भरघोस निधी 

पक्षात आलेल्या खासदारांना भरघोस निधी देण्यात येणार असल्याचं यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून सांगण्यात आलं आहे. आम्ही कोणतंच ऑपरेशन अपूर्ण ठेवत नाही. आताच ऑपरेशन टायगर आम्ही यशस्वी केलं आहे. सगळ्या कायदेशीर आणि घटनात्मक प्रक्रिया पूर्ण झालेल्या आहेत असं शिंदे यांनी यावेळी म्हटलंयं.

सहाही खासदार आनंदी 

सहाही खासदार आनंदी असून त्यांनी मूळ शिवसेनेत प्रवेश केला आहे. आधी आमच्याकडं सात खासदार होते. आत सहा खासदार आले आहेत. आमची टीम आता मोठी झाली आहे. आता शिवसेना अजून बळकट होईल. आलेल्या खासदारांच्या मतदारसंघात वेगाने काम करण्यात येतील, असं उपमुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटलं आहे.

निधी देण्याची केली सूचना 

आम्ही काही विभागांचे निधी आणण्याचे प्रस्ताव दिले आहेत. काही निधी त्यांना तात्काळ देण्याच्या सूचना तातडीने दिल्या आहेत. मतदारसंघाचा विकास हाच आलेल्या खासदारांचा अजेंडा होता. या अजेंड्याला आम्ही आता सुरुवात केली आहे. एनडीएची ताकद वाढली असून आलेल्या खासदारांच्या मतदारसंघात वेगाने काम करण्यात येतील

PREV
Maharashtra News (महाराष्ट्र बातम्या): Read Maharashtra LIVE Updates and Latest Marathi News Today. Check महाराष्ट्र राजकीय बातम्या, महाराष्ट्र क्राईम न्यूज, महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज. Watch Maharashtra Viral News Videos, Photos, Maharashtra Weather Updates in Marathi at Asianet Marathi News.
Read more Articles on

Recommended Stories

Abhijeet Dipke: आजीचं निधन, तरीही अभिजीत डिपके पोलिसांच्या ताब्यात; CJP कडून सुटकेची मागणी
Viral Video : भिवंडीत गुलाबजामच्या पाकात सापडला उंदीर, व्हिडिओ व्हायरल