राज्यात गेल्या काही दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू आहे आणि पुढील चार दिवसही वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. सध्या महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यांमध्ये संततधार पावसामुळे सकाळपासूनच मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे
नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यात नद्या-नाले दुथडी भरून वाहू लागल्या आहेत. पुणेगाव धरण ७५% भरले असून, त्यातून उनंदा नदीला १०० क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे, ज्यामुळे वणी आणि चांदवड तालुक्यातील पाणीपुरवठा योजनांना मोठा दिलासा मिळाला आहे. सातपुडा परिसरात असणारा वाल्हेरी धबधबाही वाहायला लागला आहे, परंतु अपघात टाळण्यासाठी प्रशासनकडून अधिक सुरक्षा व्यवस्था करण्याची मागणी करण्यात येत आहे
भंडारा जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे, तर पुणे, रत्नागिरी, रायगड, गोंदिया, सातारा, मुंबई, ठाणे, नंदुरबार, धुळे, जालगाव, नागपूर, चंद्रपूर आणि गडचिरोलीसह अनेक भागांना येलो अलर्टअंतर्गत सावधगिरीचा सल्ला देण्यात आला आहे. उद्या रत्नागिरी, गोंदिया आणि सातारा घाटमाथ्यावर पुन्हा ऑरेंज अलर्ट, तर इतर काही जिल्ह्यांवर यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे
या पावसामुळे रेल्वे वाहतुकीवरही मोठा परिणाम होत आहे. मुंबईतील लोकल ट्रेन उशिराने धावत आहेत, त्यामुळे कामावर जाणाऱ्या लोकांची अडचण झाली आहे. घाटमाथ्यावर रेल्वे मार्गांवरील प्रकल्पांमुळे रेल्वे उशीरा धावत आहेत. नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळावा आणि प्रशासनाने सतर्कता ठेवावी असे आवाहन करण्यात येत आहे.