
सध्या संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकारणात ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याची चर्चा सुरु आहे. तब्बल २० वर्षानंतर राज आणि उद्धव एकत्र आले. त्यांनी एकमेकांना मिठी मारली आणि मराठी लोकांच्या डोळ्यांतून पाणी वाहील. यावेळी अमित ठाकरे आणि अदित्य ठाकरे हे स्टेजवर एकत्र आले होते. यावेळी उद्धव यांनी फडणवीस यांचा अनाजीपंत असा उल्लेख केला होता, त्यावरून परत एकदा वादाला सुरुवात झाली.
उद्धव ठाकरे यांनी फडणवीस यांना अनाजीपंत असं उद्देशून म्हटलं होत. कार्यक्रमाची घोषणा झाल्यानंतर सगळ्यांचं लक्ष आमच्या भाषणांकडे आहे. पण आमच्या भाषणांपेक्षा आमचं एकत्र दिसणं महत्त्वाचं आहे. आमच्यात जो काही आंतरपाट होता तो अनाजीपंतांनी दूर केला, असं उद्धव ठाकरे म्हणाले. याला सांगलीत गोपीचंद पडळकर यांनी प्रत्युत्तर दिल आहे.
गोपीचंद पडळकर “उद्धव ठाकरे हे सूर्याजी पिसाळाची औलाद आहे. 2019 मध्ये महाराष्ट्राच्या जनतेने देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री होण्याचे बहुमत दिले होते. पण उद्धव ठाकरेंनी काँग्रेस राष्ट्रवादीसोबत अनैसर्गिक युती करत केली. हे सूर्याजी पिसाळासारखे काम उद्धव ठाकरेंनी केले आहे. देवेंद्र फडणवीस हे या महाराष्ट्रातील गोर गरीब लोकांच्या गळ्यातील ताईत आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरे काय बोलले याला काडीचे महत्त्व नाही” असं गोपीचंद पडळकर यांनी म्हटलं आहे.
“२०१९ ला त्यांनी फडणवीसांचा घात केला. महाराष्ट्रातील जनतेने भरघोस मतदान महायुतीचे भरघोस आमदार दिले. उद्धव ठाकरेंकडून दिव्याच्या गाड्या, प्रोटोकॉल, झेड प्लस सुरक्षा सर्व गेलं आहे. काहीही राहिलं नाही? कोणी येतंय का? आता मातोश्रीवर आणि उध्दव ठाकरेंना भेटायला कोण जात नाही, त्यामुळे उद्धव ठाकरेंचे मानसिक संतुलन बिघडले आहे. सध्या सर्व गर्दी ही भाजपकडे, एकनाथ शिंदेंकडे आहे. त्यामुळे ते वैफल्यग्रस्त बनले आहेत” असंही पुढं बोलताना फडणवीस यांनी म्हटलं आहे.