उत्सवाच्या मुख्य दिवशी श्री साईसच्चरित या पवित्र ग्रंथाच्या अखंड पारायणाची समाप्ती झाली. अखंड पारायण समाप्ती मिरवणूकीत संस्थानचे तदर्थ समितीच्या अध्यक्षा तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश अंजु शेंडे (सोनटक्के) यांनी पोथी, मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी वीणा तर उप मुख्य कार्यकारी अधिकारी भिमराज दराडे व मेकॅनिकल विभाग प्रमुख अतुल वाघ यांनी प्रतिमा घेवून सहभाग घेतला यावेळी प्रशासकिय अधिकारी संदीपकुमार भोसले, मंदिर विभाग प्रमुख विष्णु थोरात, प्र.जनसंपर्क अधिकारी दिपक लोखंडे, मंदिर पुजारी, शिर्डी ग्रामस्थ व साईभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.