सांगलीमधील ऋतुजा राजगेच्या प्रकरणावर गोपीचंद पडळकर यांचे वादग्रस्त विधान, म्हणाले- धर्मांतर करण्यासाठी कोणी आल्यास...

Published : Jun 18, 2025, 08:16 AM ISTUpdated : Jun 18, 2025, 08:20 AM IST
Gopichand Padalkar

सार

Maharashtra : सांगलीमध्ये धर्मांतरामुळे आत्महत्या केलेल्या ऋतुजा रागेचे प्रकरण राज्यात चांगलेच तापले गेले आहे. याच प्रकरणावरुन भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी सांगलीमधील विराट मोर्चामध्ये काही वादग्रस्त विधाने केली आहेत. 

Gopichand Padalkar Controversial Statement : सांगलीतील धर्मांतरामुळे आत्महत्या केलेल्या गर्भवती ऋतुजा राजगेच्या मृत्यूनंतर संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली आहे. धर्मवीर संभाजी महाराजांच्या विचारांची प्रेरणा घेणाऱ्या ऋतुजाने धर्मासाठी बलिदान दिलं, अशी भावना भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी व्यक्त केली. सांगलीत विराट मशाल मोर्चादरम्यान ते बोलत होते.

"माझा जीव गेला तरी धर्म बदलणार नाही" 

गोपीचंद पडळकर म्हणाले की, "संभाजी महाराजांनी औरंगजेबासमोर धर्म न बदलण्याची प्रतिज्ञा केली आणि हालअपेष्टा सहन करून बलिदान दिलं. ऋतुजाही त्याच विचारांची कन्या होती." ती उच्चशिक्षित आणि स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारी होती. पण तिच्यावर सासरच्या लोकांनी धर्मांतरासाठी दबाव टाकला आणि छळ केल्यामुळे तिने आत्महत्या केली.

आता 'ठोक मोहीम' सुरू करणार 

पडळकरांनी भाषणात थेट म्हटले की, "आता धर्मांतर घडवून आणण्यासाठी येणाऱ्यांना गावागावातून ठोकून काढण्याची मोहीम सुरू करू. पोलिसांची काळजी करू नका, ती मी पाहतो."

“त्याचा सैराट करणाऱ्याला ११ लाख बक्षीस”- गोपीचंद पडळकर

त्यांनी पुढे म्हटले, “गावात धर्मांतरासाठी कोणी आलं, तर त्याला ठोकल्यास पाच लाख रुपये, आणि त्याचा ‘सैराट’ (अर्थात ठार) केल्यास 11 लाखांचं बक्षीस दिलं पाहिजे.” त्यांनी धर्मांतर करणाऱ्यांना 'हिरवे साप' आणि 'ख्रिश्चन अजगर' अशी टोकाची उपमा देत जळजळीत भाषण केलं.

“धर्मांतरासाठी येणाऱ्यांचे खांडोळे करा, आम्ही बघतो”

"हिंदू धर्म टिकवणं आमचं प्रथम कर्तव्य आहे. धर्मांतर थोपवण्यासाठी पोलिसांचा आधार घेण्याची गरज नाही, आम्हीच हाताळू. हिंदू धर्म अनेक आक्रमणांनंतरही टिकून आहे, आणि तो टिकवण्यासाठी कोणतीही किंमत द्यायला तयार आहोत," असे पडळकर म्हणाले.

नक्की काय आहे प्रकरण? 
सांगलीतील कुपवाड परिसरात राहणाऱ्या ऋतुजा राजगे हिने सासरच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. ऋतुजाच्या माहेरच्यांनी केलेल्या आरोपानुसार, तिच्यावर विवाहानंतर धर्मांतर करण्यासाठी सतत दबाव टाकण्यात येत होता. ऋतुजाचा विवाह वर्ष 2021 मध्ये सुकुमार राजगे या नायब तहसीलदाराशी झाला होता. लग्नाआधी ती हिंदू धनगर समाजाची होती. 

ऋतुजाच्या आईवडिलांनी दाखल केलेल्या पोलीस तक्रारीत नमूद केल्याप्रमाणे, तिला देवाच्या पाया पडू नकोस, असा सक्तीनं आदेश देण्यात येत होता, तसेच धार्मिक परंपरा पाळण्यास विरोध होत होता. या सततच्या मानसिक आणि धार्मिक दबावामुळेच तिने आत्महत्यासारखे टोकाचे पाऊल उचलले, असा आरोप तिच्या कुटुंबियांनी केला आहे. विशेषतः, ऋतुजा सात महिन्यांची गरोदर असताना तिने आपले जीवन संपवले, ही बाब अधिक धक्कादायक ठरली आहे. या प्रकरणात ऋतुजाच्या सासरच्या लोकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून संबंधित आरोपींना अटक करण्यात आली आहे. सध्या कुपवाड पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

गोपीचंद पडळकर यांची काही वादग्रस्त विधाने

शरद पवारांवर टीका : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर गोपीचंद पडळकर यांनी अनेकदा आपल्या भाषणांमधून टीका केली आहे. पण वर्ष 2020 मध्ये पडळकर यांनी म्हटले होते की, “शरद पवार हे ब्राह्मणद्वेष्टे आहेत. त्यांनी ओबीसी समाजाचे नेहमीच नुकसान केले.” या विधानामुळे राजकीय वर्तुळात मोठा गदारोळ झाला होता.

लव्ह जिहाद विषयावर वादग्रस्त विधान : गोपीचंद पडळकर यांच्या वादग्रस्त विधानांमध्ये मुस्लिम समाजाबद्दल आक्षेपार्ह भाष्यही केले आहे. खरतंर, पडळकर यांनी लव्ह जिहादवरुन म्हटले की, “लव्ह जिहाद करणारे हिरवे साप आहेत”. त्यांचे हे विधान धार्मिक तेढ वाढवणारे ठरू शकते.

ओबीसी आरक्षणाबाबत सरकारवर आरोप : वर्ष 2021 मध्ये ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर पडळकर यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला होता. तेव्हा पडळकर म्हणाले होते की, “मराठा समाजाला ओबीसीमध्ये घुसवण्याचा डाव चालू आहे”. त्यांच्या या विधानावरुनही वादाला ठिगणी पेटली होती. 

(राहा अपडेट, राहा जगाच्या पुढे. सातत्याने अपडेट होणाऱ्या आमच्या फेसबुक आणि एक्स (ट्विटर) पेजला सबक्राईब करुन ताज्या घडामोडी जाणून घ्या.)

आमच्या एशियानेट न्यूज मराठीच्या फेसबुक पेजला सबस्क्राईब करा. त्यासाठी येथे क्लिक करा.

आमच्या एशियानेट न्यूज मराठीच्या एक्स (ट्विटर) पेजला सबस्क्राईब करा. त्यासाठी येथे क्लिक करा.

PREV
Read more Articles on

Recommended Stories

Baba Adhav : ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव यांचे निधन, सत्यशोधकी विचारांचा अखेरचा दिवा मालवला
प्रवाशांसाठी तातडीची सूचना! लोणावळा यार्ड विस्तारामुळे रेल्वे वेळापत्रकात मोठा बदल; तुमची ट्रेन उशिरा धावणार का? लगेच तपासा!