गुरुवारी सकाळी हिंगोली जिल्ह्याला भूकंपाचे धक्के जाणवल्याची माहिती मिळत आहे. जिल्ह्यात 4.5 रिश्टर स्केल भूकंपाची नोंद करण्यात आली आहे.
Maharashtra Earthquake : गुरुवारी (21 मार्च) सकाळी हिंगोली जिल्ह्याला भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. जिल्ह्यात 4.5 रिश्टर स्केलच्या भूकंपाची नोंद करण्यात आल्याची माहिती नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजी (NCS) यांनी दिली आहे.
हिंगोलीत भूकंपाचे धक्के जाणवल्याने आजूबाजूच्या परिसरात नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. स्थानिक अधिकाऱ्यांकडून भूकंपाचे धक्के जाणवल्याच्या स्थितीबद्दल अधिक आढावा घेतला जात आहे. अधिकाऱ्यांच्या मते, भूकंपाचे धक्के मध्यम स्वरूपाचे होते. पण संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले.
नॅशनल सेंटर फॉर सिस्मोलॉजी ट्विट
हिंगोलीत जाणवलेल्या भूकंपाच्या धक्क्याबद्दल नॅशनल सेंटर फॉर सिस्मोलॉजी यांनी ट्विट केले आहे. ट्विटमध्ये म्हटलेय की, 15 मार्चला सकाळी 6 वाजून 19 मिनिटे 05 सेंकदाववेळी भूकंपाचे धक्के जाणवले गेलेत.
भूकंपाची तीव्रता कशी मोजली जाते?
भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलच्या आधारावर मोजली जाते. रिश्टर स्केल भूकंपाचे धक्के मोजण्याचे एख गणितीय पद्धत असून त्याला रिश्टर मॅग्निट्यूट टेस्ट स्केल असे म्हटले जाते. रिश्टर स्केलवर भूकंपाचा केंद्रबिंदू म्हणजेच एपीसेंटर पासून 1-9 पर्यंतच्या आधारावर मोजला जातो. हे मोजमाप भूकंपावेळी जमिनीखालून निघालेल्या उर्जेच्या आधाराच्या तीव्रतेवर असते.
आणखी वाचा :
गडचिरोली येथे चार नक्षलवादी ठार, लोकसभा निवडणुकीवेळी गडबड करण्याचा रचला होता कट
लोकसभा निवडणुकीआधी राज ठाकरे दिल्लीत दाखल, NDA मध्ये सहभागी होण्याच्या चर्चांना उधाण