संभाजीनगरकरांसाठी खुशखबर! दिवाळीत धावणार मुंबई-नांदेड स्पेशल ट्रेन, वेळापत्रक आताच पाहा!

Published : Oct 16, 2025, 05:19 PM IST

Diwali Special Train: दिवाळीनिमित्त रेल्वे प्रशासनाने छत्रपती संभाजीनगरकरांसाठी मुंबई, नांदेड, करीमनगर येथे जाण्यासाठी विशेष ट्रेनची घोषणा केली. सणासुदीच्या काळात होणारी गर्दी कमी करून प्रवाशांना आरामदायी प्रवास उपलब्ध करून देणे हा यामागचा उद्देश आहे

PREV
16
छत्रपती संभाजीनगरकरांना रेल्वेचं खास गिफ्ट

छत्रपती संभाजीनगर: दिवाळीचा सण जवळ येतोय आणि त्यातच रेल्वे प्रशासनाने छत्रपती संभाजीनगरकरांसाठी दिलीये आनंदाची बातमी! सणासुदीच्या काळातील वाढती गर्दी लक्षात घेता, रेल्वेने मुंबई, नांदेड आणि करीमनगरसाठी विशेष ट्रेनची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. प्रवाशांसाठी ही एकप्रकारे "दिवाळी ट्रॅव्हल गिफ्ट"च ठरणार आहे. 

26
ही आहे विशेष ट्रेनची माहिती

1. नांदेड ते संभाजीनगर विशेष गाडी (क्रमांक 07614):

प्रस्थान: 17 ऑक्टोबर, रात्री 8:50 (नांदेडहून)

पोहचण्याचा वेळ: 18 ऑक्टोबर, सकाळी 7:20 (छ. संभाजीनगर) 

36
2. मुंबई ते करीमनगर वातानुकूलित विशेष गाडी (क्रमांक 01021)

प्रस्थान: 18 ऑक्टोबर, रात्री 12:20 (मुंबईहून)

थांबा: छ. संभाजीनगर स्थानकावर देखील थांबा 

46
3. करीमनगर ते मुंबई (परतीची गाडी)

प्रस्थान: 18 ऑक्टोबर, सायंकाळी 5:30 (करीमनगरहून)

छ. संभाजीनगर आगमन: 19 ऑक्टोबर, पहाटे 4:30

यानंतर गाडी मुंबईकडे रवाना होईल. 

56
थांबे (दोन्ही दिशांनी)

दादर, ठाणे, कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, मनमाड, नागरसोल, छ. संभाजीनगर, जालना, परतूर, सेलू, परभणी, पूर्णा, नांदेड, मुदखेड, धर्माबाद, बासर, निजामाबाद, आर्मूर, मेटपल्ली, कोरटल, करीमनगर. 

66
प्रवाशांसाठी दिलासा, सणासुदीचा बोनस!

या विशेष गाड्यांमुळे छ. संभाजीनगरकरांना आपल्या लाडक्या सणासाठी मुंबई, नांदेड किंवा करीमनगरकडे प्रवास करणं सोयीचं आणि आरामदायक होणार आहे. गर्दीच्या काळात ही व्यवस्था म्हणजे रेल्वेकडून खरोखरच ‘दिवाळी बोनस गिफ्ट’ आहे.

RG
About the Author

Rameshwar Gavhane

रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.Read More...
Read more Photos on

Recommended Stories