Maharashtra Weather Alert: हवामान विभागाने 16 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्रातील 13 जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट जारी केला आहे. कोकण, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील अनेक भागांत वीजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस अपेक्षित आहे.
मुंबई: राज्यात पुन्हा एकदा पावसाचे ढग दाटले असून, हवामान विभागाने 16 ऑक्टोबर रोजी 13 जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी केला आहे. येत्या 15, 16 आणि 17 ऑक्टोबर दरम्यान, अनेक भागांत वीजांच्या कडकडाटासह आणि जोरदार वाऱ्यांसह हलक्यापासून मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
27
मुंबईसह कोकणात काय असेल परिस्थिती?
मुंबई शहर आणि उपनगरात हवामान सामान्यतः निरभ्र राहण्याची शक्यता आहे.
धुळे, नाशिक, जळगाव आणि अहिल्यानगर जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.
मात्र, नंदुरबार जिल्हा सुरक्षित मानला जात आहे.
57
मराठवाड्यातही पावसाची शक्यता कायम
छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव आणि लातूर या पाच जिल्ह्यांना यलो अलर्ट.
जालना शहरात आधीच जोरदार पावसाची नोंद.
67
विदर्भात कोरडे हवामान
नागपूर आणि अमरावती सारख्या भागांमध्ये हवामान कोरडेच राहणार.
कमाल तापमान: 35°C
किमान तापमान: 24 ते 25°C दरम्यान.
77
मान्सून परतला पण वातावरणात बदल
राज्यभरातून नैऋत्य मान्सूनने माघार घेतली असली तरी, वातावरणातील बदलांमुळे पावसासाठी पोषक स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे काही भागांत अचानक पावसाचा जोर अनुभवायला मिळू शकतो.