अंबाजोगाई येथे खोदकामादरम्यान पुरातत्व विभागाला सापडले दोन मंदिरांचे अवशेष

बीडमधील अंबाजोगाई येथे खोदकाम करत असताना दोन मंदिरांचे अवशेष पुरातत्व विभागाला सापडले आहेत. याबद्दलची माहिती एका अधिकाऱ्याने दिली आहे.

Chanda Mandavkar | Published : Mar 28, 2024 7:00 AM IST / Updated: Mar 28 2024, 12:35 PM IST

Maharashtra : बीड येथील अंबाजोगाई जवळील सकलेश्वर मंदिराच्या खोदकामावेळी राज्य सरकारच्या पुरातत्व विभागाला दोन मंदिरांचे अवशेष सापडले आहेत. एका अधिकाऱ्याने याची माहिती दिली आहे. अधिकाऱ्यांनी म्हटले की, बाराखंबी नावानेही प्रसिद्ध अससेल्या सकलेश्वर मंदिराचे बांधकाम 1228 ईसवी सनात यादव राजवंश यांनी केले होते. यादव राजवंश यांचे दिवगिरी किल्ल्यावर शासन असल्याचे एका अभिलेखातून समोर आले आहे.

राज्यातील पुरातत्व विभागाचे सहाय्य निर्देशक अमित गोटे यांनी दिलेल्या माहितीनुसार, खोदकाम 15 मार्चला सुरू करण्यात आले होते. 100-100 स्क्वेअर फूटचे 14 हिस्से तयार केले. आम्हाला दोन मंदिरांचे अवशेष मिळाले आहेत. यापैकी एका मंदिराचे नाव आहे खोलेश्वर. जे यादव सैन्य नायक यांच्या नावावर आहे. याशिवाय काही विटा सापडल्या असून त्यावरून कळते की, मंदिराच्या कळसाच्या असू शकतात. मूर्तींचे हात, पाय असेही अवशेषही खोदकामावेळी मिळाले आहेत.

अंबाजोगाईत खोदकाम करताना सापडलेल्या अवशेषांचे सर्वेक्षण केले जाईल. याआधी अंबाजोगाईला अमरापुर, जयंतीपुर, जोगायम्बे नावानेही ओखळले जायचे अशी माहिती गोटे यांनी दिली. याला हैदराबादमधील निजामच्या शासनकाळादरम्यान मोमिनाबाद नावानेही ओखळले जायचे. यामध्ये हत्तीखाना, दासोपंत मंदिर, योगेश्वरी मंदिरसारखे अन्य स्मारकही आहेत.

आणखी वाचा : 

Lok Sabha Election 2024 : भाजपकडून महाराष्ट्रातील स्टार प्रचारकांची यादी जाहीर, पंतप्रधान नरेंद्र मोदींसह या दिग्गज नेत्यांना दिलीय जबाबदारी

Special Train : नागपुर ते मडगावदरम्यान जूनपर्यंत चालवली जाणार स्पेशल ट्रेन, जाणून घ्या वेळापत्रक

गडचिरोली येथे चार नक्षलवादी ठार, लोकसभा निवडणुकीवेळी गडबड करण्याचा रचला होता कट

 

Share this article