
टाटा समूहातील एअर इंडिया ने २१ जूनपासून १५ जुलैपर्यंत काही फ्लाईट्स बंद केल्या आहेत. यात पुणे–सिंगापूर, बेंगळुरू–सिंगापूर आणि मुंबई–वडोदरा मार्गांचा समावेश आहे.
पुणे–सिंगापूर दररोज उड्डाण करणारी AI‑2111/2110 फ्लाइट बंद करण्यात आली आहे. २०२२ मध्ये सुरू झालेली ही फ्लाइट आता तात्पुरती बंद ठेवण्यात आली आहे. यामुळे पुण्यातून होणाऱ्या आंतरराष्ट्रीय वाहतुकीवर परिणाम होणार आहे. दिल्ली–पुणे, दिल्ली–मुंबई, मुंबई–बेंगळुरू, दिल्ली–हैदराबाद, कोल्हापूर, नाशिकसारख्या १९ भारतातील मार्गांवरील फ्लाईट्स काही बंद केल्या आहेत. या निर्णयामागे विश्वासपूर्ण सेवा बनवणे हेच एक उद्दिष्ट्य असल्याचे सांगितलं आहे.
एअर इंडिया किंवा इतर विमान कंपन्यांनी यापूर्वीही अशा प्रकारे फ्लाइट रद्द केल्या आहेत किंवा वेळापत्रकात बदल केले आहेत. यामागे अनेक कारणं आहेत – तांत्रिक बिघाड, विमानांची कमतरता, हवामान बदल, किंवा आंतरराष्ट्रीय धोरणांमधील बदल कारण आहेत. उदाहरणार्थ, २०२० मध्ये कोरोनाच्या काळात अनेक देशांनी लॉकडाऊन केल्यामुळे भारतातून चालणाऱ्या अनेक आंतरराष्ट्रीय फ्लाइट्स रद्द करण्यात आल्या होत्या. त्यावेळी विशेषतः यूएस, युके, कॅनडा, आणि गल्फ देशांमधील प्रवासी अडकले होते. सरकारने नंतर ‘वंदे भारत मिशन’द्वारे त्यांना परत आणले.
तसेच २०२3 साली स्पाईसजेट, गो फर्स्ट आणि इंडिगो यांसारख्या कंपन्यांनीही काही मार्गांवरील फ्लाइट्स कमी केल्या होत्या, कारण त्यांच्या काही विमानांमध्ये इंजिनच्या समस्यांमुळे वेळेवर सेवा देणं कठीण झालं होतं. त्यामुळे प्रवाशांना पर्यायी फ्लाइट्स देणं, रिफंड प्रक्रिया करणं, हे सगळं वेळेवर करणं ही मोठी जबाबदारी बनत आहे.