
शिवसेना नेते भास्कर जाधव यांनी पुन्हा एकदा पक्षातील नाराजीचा सूर स्पष्ट शब्दांत व्यक्त केला आहे. संजय राऊत यांच्या वक्तव्यावर त्यांनी थेट आक्षेप नोंदवला आहे. रविवारी माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी म्हटलं की, “राऊत वरचेवर मला सावरण्याची भाषा करतात. पण त्यामुळे मी नाराज असल्याचा चुकीचा संदेश बाहेर जातोय.”
या विधानावर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी शांत पण स्पष्ट भूमिका मांडली. ते म्हणाले, “भास्कर जाधव आमचे सहकारी, पक्षातील वरिष्ठ नेते आहेत. त्यांचा अनुभव खूप मोठा आहे. त्यांनी पक्षाच्या अनेक जबाबदाऱ्या पेलल्या आहेत. ते आक्रमक आणि उत्तम वक्ते आहेत. त्यांच्या मनात काय आहे, हे आम्ही नक्की समजून घेऊ, कारण ते आमचेच आहेत.”
भास्कर जाधवांनी यावेळी स्पष्ट केलं की, “संजय राऊत माझे सीनियर आहेत, आणि माझ्या पाठीशी उभे राहतात. पण मला भाषण करण्याची संधी मिळाली होती. माझ्या भाषणानंतरच राऊतांचं भाषण होतं. त्यामुळे पक्ष मला डावलतोय असा चुकीचा अर्थ त्यांच्या बोलण्यामुळे बाहेर जातोय.”
सध्याच्या घडामोडी पाहता, कोकणातील सक्रिय आणि जनतेशी थेट संवाद साधणारे भास्कर जाधव हे पक्षासाठी महत्त्वाचे नेते आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्यासमोर त्यांना विश्वासात घेणे, ही मोठी जबाबदारी असणार आहे. आगामी काळात जाधव काय भूमिका घेतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
भास्कर जाधव आणि संजय राऊत वाद – नेमकं काय घडलंय?
शिवसेनेतील दोन ज्येष्ठ नेते – भास्कर जाधव आणि संजय राऊत – यांच्यात सध्या काहीसा वैचारिक विसंवाद समोर येतो आहे. जरी याला ‘वाद’ म्हणणे अतिरेक ठरेल, तरीही भास्कर जाधव यांनी वारंवार पक्षातील नाराजी आणि स्वतःच्या दुर्लक्षिततेबद्दलची खंत जाहीरपणे बोलून दाखवल्याने चर्चेला उधाण आले आहे.
नेमकी पार्श्वभूमी काय?
(राहा अपडेट, राहा जगाच्या पुढे. सातत्याने अपडेट होणाऱ्या आमच्या फेसबुक आणि एक्स (ट्विटर) पेजला सबक्राईब करुन ताज्या घडामोडी जाणून घ्या.)
आमच्या एशियानेट न्यूज मराठीच्या फेसबुक पेजला सबस्क्राईब करा. त्यासाठी येथे क्लिक करा.
आमच्या एशियानेट न्यूज मराठीच्या एक्स (ट्विटर) पेजला सबस्क्राईब करा. त्यासाठी येथे क्लिक करा.