वडिलांनी पोटच्या २५ वर्षीय मुलाचा केला खून, दारुच्या व्यसनाने हसते खेळते घर उद्ध्वस्त

Published : Jun 23, 2025, 01:48 PM ISTUpdated : Jun 23, 2025, 03:24 PM IST
jalgaon alcohol

सार

जळगाव जिल्ह्यात एका वडिलांनी दारूच्या नशेत असलेल्या २५ वर्षीय मुलाचा खून केला आहे. मुलाच्या सततच्या त्रासाला कंटाळून वडिलांनी हे कृत्य केले.

जळगाव जिल्ह्यातील एका गावात खूप दुःखद घटना घडली आहे. वडिलांनी आपल्या २५ वर्षीय मुलाचा निर्घृण खून केला आहे. तो मुलगा रोज दारू प्यायचा, घरात वाद घालत असे आणि कुटुंबाला त्रास द्यायचा. या सततच्या त्रासामुळे रागाच्या भरात वडिलांनी त्याच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला.

हा मुलगा मागील काही महिन्यांपासून दारूच्या व्यसनात बुडाला होता. घरच्यांनी त्याला समजवण्याचा प्रयत्न केला, पण त्याने ऐकून घेतले नाही. उलट त्याच्या वर्तनामुळे घरात नेहमी तणाव होत असे. घटनेच्या दिवशी त्याच्याच वडिलांशी वाद झाला आणि वडिलांनी रागात येऊन अत्यंत टोकाचा निर्णय घेतला आहे.

पोलिसांनी या प्रकरणात वडिलांना अटक केली असून तपास सुरू आहे. या घटनेतून प्रत्येक कुटुंबाला एक नवीन संदेश मिळाला आहे. यामधून मिळालेला संदेश असा की व्यसन खूप धोकादायक असत. व्यसनामुळे फक्त व्यक्तीच नाही, तर संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त होतं असतं.

समाजात अशा घटनांपासून शिकून, वेळेत व्यसनमुक्ती, समुपदेशन, आणि संवाद यांसारख्या गोष्टींना प्राधान्य दिलं पाहिजे. एकत्र राहताना सहनशक्ती आणि समजून घेण्याची खूप गरज असते. रंगात घेतलेला एक निर्णय आपलं संपूर्ण आयुष्य बदलवून टाकू शकतो. त्यामुळं व्यसन करताना आपण नेमकं कोणाचं नुकसान करतोय, याची जाणीव लक्षात यायला हवी.

जळगावमधील वडिलांनी मुलाचा खून केल्याची घटना ही केवळ गुन्हा नाही, तर ती आपल्या समाजात वाढणाऱ्या मानसिक ताणतणाव, व्यसनाधीनता आणि तुटलेल्या संवादाची भीषण साक्ष आहे. एका घरात राग, अपेक्षा आणि असहायता यांचा स्फोट झाला आणि एका पित्याच्या हातून आपल्या पोटच्या गोळ्याचा जीव गेला. घरात चांगला सुसंवाद असता तर ही वेळ त्याच्यावर आलीच नसती.

वडिलांनी मुलाला ढकलून दिल्यामुळं त्याचा झाला मृत्यू 

पूर्वी अशाच स्वरूपाची एक घटना छत्रपती संभाजीनगरमध्ये २०१९ मध्ये घडली होती. दारूच्या नशेत सतत घरात त्रास देणाऱ्या मुलावर राग आल्याने एका वडिलांनी त्याला जोरात ढकलून दिलं आणि त्याचा डोक्याला मार लागून मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झालं आणि वडिलांना जन्मठेप झाली.

तसंच २०१७ साली बीड जिल्ह्यात एक वृद्ध आईने आपल्या ३० वर्षीय मुलाचा गळा आवळून खून केला होता, कारण तो दिवसेंदिवस व्यसनात बुडत चालला होता, त्यानं आईवर हात उचलत होता. या आईने पोलीस ठाण्यात जाऊन स्वतः गुन्हा कबूल केला. हे दोन्ही प्रसंग मन हेलावून टाकणारे होते.

समुपदेशनाची गरज 

या घटना आपल्याला सांगतात की, व्यसन हे फक्त व्यक्तीचं नव्हे तर संपूर्ण कुटुंबाचं आयुष्य खराब करतं. यावर उपाय म्हणजे वेळेत समुपदेशन, व्यसनमुक्ती केंद्रांशी संपर्क, आणि घरगुती संवाद वाढवायला हवा. रागाच्या भरात कोणतीही गोष्ट सुटत नाही, उलट आयुष्यभराचं दुःख मिळतं. म्हणूनच समाजात मानसिक आरोग्य, संयम आणि समजूतदारपणा यांची नितांत गरज आहे.

PREV
Read more Articles on

Recommended Stories

महाराष्ट्रात 'थंडीचा कहर'! तापमान 'मायनस'मध्ये जाणार; 'या' ३ जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट, तुमच्या शहराचं तापमान तपासा!
मोठी बातमी! नवी मुंबईकरांसाठी 'जॅकपॉट'! तुमच्या प्रवासात होणार 'हा' सर्वात मोठा बदल; दोन नवीन रेल्वे स्थानकांची घोषणा!