गळा आवळून पत्नीचा खून, नंतर चिमुकलीलाही संपवलं – आरोपीने पोलिसांना दिली कबुली

Published : May 04, 2025, 04:49 PM IST
Haryana rape case

सार

अकोल्यातील तार फाईल परिसरात एका पतीने पत्नी आणि चार वर्षीय मुलीची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. कौटुंबिक वादातून घडलेल्या या दुहेरी हत्येने परिसरात शोककळा पसरली आहे.

अकोला | प्रतिनिधीतार फाईल परिसरात एका पतीने आपल्या पत्नी आणि चार वर्षीय मुलीची हत्या करून संपूर्ण परिसरात शोककळा पसरवली आहे. कौटुंबिक वादाच्या पाश्वभूमीवर घडलेली ही दुहेरी हत्या नात्यांच्या जबाबदारीचा आणि मानसिक संतुलनाचा प्रश्न पुन्हा एकदा अधोरेखित करते.

एका फोनने उघड झाली दुर्दैवी कहाणी शनिवारी सकाळी पोलिसांना आलेल्या एका थरारक फोन कॉलने खळबळ उडवली. "मी पत्नी आणि मुलीचा खून केला आहे," असं सांगत आरोपी सुरज गणवीर (राहिवासी – तार फाईल, अकोला) याने स्वतः गुन्ह्याची कबुली दिली. घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी जबरदस्तीने घरात प्रवेश केला आणि समोर दिसलेली दृश्यं पाहून क्षणभर हादरले.

गुन्ह्याची कहाणी: राग, वाद आणि शेवटचा निर्णय सुरज आणि अश्विनी 

दोघांचंही हे दुसरं लग्न. काही महिन्यांपूर्वी सुरू झालेलं हे नातं सततच्या भांडणांमुळे तणावात होतं. सुरज केटरिंग व्यवसायात होता. मानसिक अस्थैर्य आणि रागाचा ताबा सुटल्याने त्याने प्रथम पत्नीचा गळा दाबून खून केला. ती श्वास घेत होती म्हणून पुन्हा ओढणीने गळा आवळून मृत्यू निश्चित केला. त्यानंतर त्या चार वर्षीय चिमुरडी – आयशा – हिला सुद्धा दया न दाखवता गळा दाबून संपवलं.

सावत्र संबंध आणि मनोव्यापाराचा प्रश्न 

आयशा ही अश्विनीची पहिल्या लग्नातील मुलगी होती. पित्याच्या जागी आलेल्या व्यक्तीकडून तिला प्रेम मिळण्याऐवजी मिळाली ती क्रूर मृत्यू. या दुर्दैवी घटनेतून सावत्र नात्यांमधील गुंतागुंतीचा आणि अपूर्ण स्वीकाराचा त्रास अधोरेखित होतो.

पोलीस तपास सुरू 

समाजात संतापाची लाट घटनेची माहिती मिळताच रामदास पेठ पोलीस स्टेशनच्या पथकाने आरोपीला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे. परिसरात संतापाची लाट आहे. नागरिकांनी पोलिसांकडे मागणी केली आहे की अशा गुन्ह्यांना कठोर शिक्षा द्यावी.

PREV

Recommended Stories

प्रवाशांसाठी तातडीची सूचना! लोणावळा यार्ड विस्तारामुळे रेल्वे वेळापत्रकात मोठा बदल; तुमची ट्रेन उशिरा धावणार का? लगेच तपासा!
भाविकांसाठी बंपर गिफ्ट! शिर्डी आणि तिरुपतीला जाणाऱ्यांसाठी आता साप्ताहिक स्पेशल रेल्वे; लगेच पाहा संपूर्ण वेळापत्रक!