
Maharashtra Accident : महाराष्ट्र दिनाच्या सुट्टीवेळी आलेल्या चाकरमान्यांचा एका खासगी बस ट्रॅव्हल बसमधून जाताना पुणे-सातारा महामार्गावर ट्रकने धडक दिली. या अपघातात एकूण 19 जण जखमी झाले. यामधील सात जणांची प्रकृती गंभीर झाली आहेत. या सर्वांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जखमी व्यक्ती साताऱ्यामधील वाई परिसरातील आहेत.
प्राजक्ता सतीश धनवे यांनी राजगड पोलीस ठाण्यात माहिती दिली. यानंतर पोलिसांनी बसचालकाच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. खरंतर, सुट्टीसाठी आलेले सर्वजण कामावर परत जाण्यासाठी वाई येथून ट्रॅव्हल बसने मुंबई-पुण्याकडे जात होते. यावेळी टायर फुटल्याने टम्पो महामार्गावर बंद झाला. तेव्हाच समोरुन वाहनाने अचानक कट मारल्याने टॅम्पो दिसला नाही. अशातच मागून आलेल्या ट्रॅव्हल बसची टेम्पोला धडक बसली.
या अपघातात 19 जण जखमी झाल्याचे दिसून येत आहेत. याशिवाय काहीजण अतिगंभीर असून त्यांच्या डोक्याला दुखापत आणि हाडे फ्रॅक्चर झाल्याचे सांगण्यात आले आहे.