महाराष्ट्रात मुसळधार पावसाने हजेरी लावली असून, पश्चिम महाराष्ट्रात वादळी वाऱ्यांसह जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पुणे आणि कोल्हापूर जिल्ह्यात अतिवृष्टी झाली असून, हवामान विभागाने अनेक ठिकाणी सतर्कतेचा इशारा दिला आहे.
राज्यात पावसाचे थैमान; पश्चिम महाराष्ट्राला धोक्याचा इशारा, पुणे जिल्ह्यात अतिवृष्टी होणार
महाराष्ट्रात सगळीकडेच मुसळधार पाऊस पडत असून त्यामुळं लोकांची मोठ्या प्रमाणावर दुरावस्था झाल्याचं पाहायला मिळालं आहे. पाऊस पाण्याचे बाहेर पडताना हवामान चेक करूनच बाहेर जावं असं सांगण्यात आलं आहे.
25
पश्चिम महाराष्ट्रात वादळी वाऱ्यांसह पाऊस पडणार
राज्यात काही दिवसांपासून पावसाचा जोर मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. या वाढलेल्या पावसामुळे नोकरदार लोकांची मोठ्या प्रमाणावर अडचण निर्माण होत आहे. मागील 24 तासात 13 जिल्ह्यातील 166 मंडळात अतिवृष्टी झाली आहे. आज मंगळवार 16 सप्टेंबर रोजी पश्चिम महाराष्ट्रासह राज्यात वादळी वारे, विजांसह जोरदार पावसाची शक्यता आहे.
35
पश्चिम महाराष्ट्रात वादळी वाऱ्यांसह पाऊस पडणार
रायगड आणि पुण्याच्या घाटमाथ्यावर सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. तर उर्वरित राज्यात अनेक ठिकाणी सतर्कतेचा इशारा हवामान विभागाच्या वतीने देण्यात आला आहे. त्यामुळं घराच्या बाहेर पडताना हवामान तपासून बाहेर पडणे आवश्यक आहे.
45
पुण्यात कोठे किती पाऊस झाला?
पुण्यातील उरूळीकांचन सर्वाधिक 142 मिमी पावसाची नोंद झाली. पुण्यातील केशवनगर, हवेली, कोथरुड, मुळशी, पौड, खेड, राजगुरुनगर, शिरुर, घोडनंदी, बारामती, इंदापूर, दौंड या तालुक्यांतील बहुतांश मंडळात अतिवृष्टी झाली. यावेळी कमाल तापमान 25.7 अंश सेल्सिअसवर राहिले. आज पुणे जिल्ह्यास जोरदार वादळी पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.
55
कोल्हापूर जिल्ह्यात झाला चांगला पाऊस
कोल्हापूर जिल्ह्यात चांगला पाऊस झाला आहे. या ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सांगली जिल्ह्यात पावसाने उघडीप दिली असून परत चांगला पाऊस होण्याची शक्यता आहे.