Maharashtra Rain Alert : राज्यातील अनेक जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट; मुंबईत आज मुसळधार सरी

Published : Sep 16, 2025, 09:00 AM IST

Maharashtra Rain : राज्यात कमी दाबाच्या क्षेत्रामुळे पुन्हा पावसाचा जोर वाढला असून मुंबईसह कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात आज (16 सप्टेंबर) हलका ते मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. रायगड, पुणे घाटमाथाला ऑरेंज अलर्ट दिला आहे. 

PREV
17
बंगाल- अरबी समुद्रातील कमी दाबामुळे पावसाचा जोर

बंगालच्या उपसागरासह अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यात पुन्हा पावसाने जोर धरला आहे. हवामान विभागानुसार यंदा नवरात्र, दसरा आणि दिवाळीसुद्धा पावसाळ्यातच जाण्याची शक्यता आहे. 14 सप्टेंबरपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसाचा जोर आज (16 सप्टेंबर) तिसऱ्या दिवशीही कायम आहे.

27
मुंबई आणि उपनगरात मुसळधार पाऊस

मुंबईत सकाळपासूनच पावसाच्या सरी सुरू असून ढगाळ वातावरण कायम आहे. आजही मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. हवामान विभागानुसार, सूर्याचे दर्शन होण्याची शक्यता कमी आहे.

37
ऑरेंज आणि यलो अलर्ट जारी

रायगड आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांसह पुणे घाटमाथ्याच्या भागाला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर उर्वरित महाराष्ट्रासाठी यलो अलर्ट देण्यात आला आहे.

47
कोकण विभागात हलका ते मध्यम पाऊस

कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात हलका ते मध्यम पावसाची शक्यता असून काही ठिकाणी विजांचा कडकडाट व मेघगर्जना होऊ शकते.

57
मध्य महाराष्ट्रात ढगाळ वातावरण

पुणे, कोल्हापूर आणि नाशिक जिल्ह्यांमध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस व हलक्या सरींचा अंदाज आहे. कमाल तापमान 27 ते 30 डिग्री सेल्सिअस तर किमान तापमान 22 ते 25 डिग्री सेल्सिअस दरम्यान राहील.

67
विदर्भ व मराठवाड्यातही पावसाची शक्यता

नागपूर, अमरावती, भंडारा आणि चंद्रपूर जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज असून काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस होऊ शकतो. मराठवाड्यात लातूर, छत्रपती संभाजीनगर आणि ओतूर जिल्ह्यांत हलका पाऊस व ढगाळ वातावरण राहील.

77
देशभरातील हवामान स्थिती

हवामान खात्याच्या अंदाजानुसार, सप्टेंबरमध्ये मान्सून पूर्णपणे परतणार नसून पुढील दोन दिवस पंजाब, राजस्थान, गुजरात, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड आणि बंगालसह महाराष्ट्रातही मुसळधार पावसाची शक्यता आहे.

Read more Photos on

Recommended Stories