‘पाकिस्तान जिंदाबाद’ पोस्ट करणाऱ्या तरुणीविरोधात गुन्हा; पुण्यात संतापाची लाट

Published : May 10, 2025, 08:09 AM ISTUpdated : May 10, 2025, 08:14 AM IST
Pakistan flag

सार

पुण्यातील एका युवतीने इंस्टाग्रामवर 'पाकिस्तान जिंदाबाद' अशी पोस्ट टाकल्यामुळे तिच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोस्ट व्हायरल झाल्यानंतर नागरिकांनी तक्रार केली आणि पोलिसांनी कारवाई केली. 

पुणे – सोशल मीडियावर बिनधास्तपणे राष्ट्रविरोधी मजकूर टाकणे किती महागात पडू शकते, याचा प्रत्यय पुण्यात एका युवतीला आला आहे. ‘पाकिस्तान जिंदाबाद’ अशी पोस्ट इंस्टाग्रामवर टाकल्यामुळे संबंधित युवतीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

पुण्यातील नाना पेठ परिसरात राहणाऱ्या या युवतीने काही दिवसांपूर्वी इंस्टाग्रामवर वादग्रस्त स्टोरी टाकली होती. ती पोस्ट व्हायरल झाल्यानंतर नागरिकांत संतापाची लाट उसळली. काही सामाजिक कार्यकर्त्यांनी याची तक्रार थेट पोलिसांकडे केली.

पोलिसांनी तत्काळ लक्ष देत युवतीविरोधात भारतीय दंड विधानाच्या कलमांखाली गुन्हा नोंदवला आहे. सोशल मीडियाचा गैरवापर करून देशविरोधी भावना पसरवणाऱ्या कोणालाही माफ केले जाणार नाही, असा इशारा पुणे पोलिसांनी दिला आहे.

या घटनेनंतर सोशल मीडियावर काय शेअर करावं आणि त्याचे परिणाम काय होऊ शकतात, याबाबत नव्या चर्चांना उधाण आले आहे. यासोबतच सोशल मीडियावरील कायदेशीर जबाबदारी आणि तरुणांमध्ये वाढती ‘वायरल होण्याची’ स्पर्धा यावरही प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.

PREV

Recommended Stories

Baba Adhav : ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव यांचे निधन, सत्यशोधकी विचारांचा अखेरचा दिवा मालवला
प्रवाशांसाठी तातडीची सूचना! लोणावळा यार्ड विस्तारामुळे रेल्वे वेळापत्रकात मोठा बदल; तुमची ट्रेन उशिरा धावणार का? लगेच तपासा!