Yoga Day 2024 : फुफ्फुसे निरोगी आणि मजबूत ठेवण्यासाठी दररोज सकाळी करा ही 4 योगासने, रहाल आजारांपासून दूर

Yoga For Lungs : सध्या वाढत्या प्रदुषणामुळे बहुतांशजणांना फुफ्फुसासंदर्भात समस्यांचा सामना करावा लागतो. अशातच फुफ्फुसांचे आरोग्य राखण्यासाठी येत्या 21 जूनला साजरा केल्या जाणाऱ्या योग दिनापासून तुम्ही पुढील काही 4 योगासने दररोज करू शकता.

Chanda Mandavkar | Published : Jun 18, 2024 10:20 AM IST / Updated: Jun 18 2024, 03:53 PM IST
15
हेल्दी फुफ्फुसांसाठी 4 सोपी योगासने

वाढत्या प्रदुषणामुळे फुफ्फुसासंदर्भात काही समस्या उद्भवू शकतात. याशिवाय बिघडलेल्या लाइफस्टाइल आणि चुकीच्या खाण्यापिण्याच्या समस्येमुळे फुफ्फुसांचे नुकसान होऊन काही आजारांचा सामना करावा लागू शकतो. अशातच फुफ्फुसांचे आरोग्य राखण्यासाठी पुढील 4 सोपी योगासने करू शकता.

25
भुजंगासन

भुजंगासन खांदे आणि पाठीच्या मणक्यासंदर्भात समस्या दूर करण्यासाठी मदत करते. याशिवाय दररोज भुजंगासन केल्याने फुफ्फुसांचे आरोग्यही सुधारले जाते.

35
सर्वांगासन

फुफ्फुस अधिक मजबूत होण्यासाठी तुम्ही दररोज सर्वांगासन करू शकता. याशिवाय पाठ दुखीच्या समस्येपासूनही आराम मिळू शकतो.

45
चक्रासन

चक्रासन केल्याने फुफ्फुसे मजबूत होण्यास मदत होते. याशिवाय हेल्दी आणि फिट राहण्यासही चक्रासन फायदेशीर ठरेल. खरंतर, चक्रासन केल्याने पाठीच्या मणकाही मजबूत होण्यास मदत होते.

55
उष्ट्रासन

उष्ट्रासन केल्याने श्वसनासंदर्भातील समस्या ठिक होऊ शकतात. गुडघ्यांवर बसून केल्या जाणाऱ्या उष्ट्रासनाची स्थिती 60 सेकंदांपर्यंत करू शकता.

आणखी वाचा : 

पहिल्यांदा Yoga करणार असल्यास या 5 गोष्टी ठेवा लक्षात

ऑम्लेट ते चिया पुडिंग, वजन कमी करण्यासाठी 7 हेल्दी Breakfast

Read more Photos on
Share this Photo Gallery