Marathi

ऑम्लेट ते चिया पुडिंग, वजन कमी करण्यासाठी 7 हेल्दी Breakfast

Marathi

ॲव्होकॅडो टोस्ट

ब्राउन ब्रेडवर स्मॅश केलेल्या ॲव्होकॅडो फळाची पेस्ट लावून त्यावर काळीमिरी पावडर घालून हेल्दी ब्रेकफास्ट तयार करू शकता. ॲव्होकॅडो टोस्टची चव वाढवण्यासाठी उकडलेले अंडही खाऊ शकता.

Image credits: freepik
Marathi

चिया सीड पुडिंग

बदामाचे दूध आणि रात्रभर भिजवलेल्या चिया सीड्स पासून सकाळच्या हेल्दी ब्रेकफास्टसाठी पुडिंग तयार करू शकता. यामध्ये वेगवेगळी फळ, ड्राय फ्रुट्सचाही वापर करू शकता.

Image credits: social media
Marathi

ग्रीक योगर्ट परफेट

वजन कमी करण्यासाठी सकाळच्या नाश्ताला ग्रीक योगर्ट परफेट तयार करू शकता. यासाठी ग्रीक योगर्टमध्ये बेरीज, फळ आणि ड्रायफ्रुट्सचा वापर करू शकता.

Image credits: freepik
Marathi

व्हेजिटेबल ऑम्लेट

व्हेजिटेबल ऑम्लेट तयार करण्यासाठी अंड्यासह वेगवेगळ्या भाज्यांचा वापर करत हेल्दी नाश्ता करु शकता. अत्याधिक प्रमाणात प्रोटीन मिळण्यासाठी रेसिपीमध्ये लो-फॅट चीजचाही वापर करू शकता.

Image credits: Social Media
Marathi

क्विनोआ ब्रेकफास्ट बाऊल

बदामाच्या दूधात क्विनोआ शिजवून त्यावर ड्राय फ्रुट्स फळ अथवा बेरीजचा वापर करुन क्विनोआ ब्रेकफास्ट बाऊल तयार करू शकता. क्विनोआमध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन आणि फायबर असते. 

Image credits: freepik
Marathi

कॉटेज चीज आणि फळ

कमी फॅट्स असणारे कॉटेज चीज आणि फळांचा समावेश असणारी एखादी हेल्दी रेपिसी तुम्ही सकाळच्या नाश्ताला तयार करू शकता. कॉटेज चीजमध्ये उच्च प्रमाणात प्रोटीन असते. 

Image credits: Getty
Marathi

प्रोटीन स्मूदी

बदामाच्या दूधात प्रोटीन पावडर मिक्स करुन त्यामध्ये केळ, पालक आणि एक टिस्पून बदामाचे बटर मिक्स करुन हेल्दी प्रोटीन स्मूदी तयार करू शकता. ही रेसिपी अगदी सोपी आणि झटपट होणारी आहे.

Image Credits: Pexels