दरवर्षी डिसेंबर महिन्यातच COVID-19चा नवा व्हेरिएंट का आढळतो? जाणून घ्या कारणे

Covid 19 Update : डिसेंबर महिन्यातच कोव्हिड 19 विषाणूचे नवीन व्हेरिएंट का आढळतात ? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत…

Harshada Shirsekar | Published : Dec 25, 2023 10:52 AM IST / Updated: Dec 25 2023, 04:30 PM IST
18
कोरोना व्हायरसचा नवीन व्हेरिएंट

यंदा डिसेंबर महिन्यात जगभरात कोरोना व्हायरसचा नवीन व्हेरिएंट JN.1चा फैलाव मोठ्या प्रमाणात झाल्याचे आढळले आहे. भारतातही कोरोनाच्या या नव्या व्हेरिएंटचे जवळपास 25 प्रकरणे समोर आली आहेत.

28
कोव्हिड 19 विषाणूचे तीन मोठे व्हेरिएंट्स

तीन वर्षात कोरोना व्हायरसचे अल्फा, बीटा आणि गॅमा यासारखे तीन मोठे व्हेरिएंट्स जगभरात आढळले आहेत. डिसेंबर 2021मध्ये ओमिक्रॉन व्हेरिएंट्सचा धोका निर्माण झाला होता.

38
नव्या व्हेरिएंटचा धोका

कोरोनाचा नवीन व्हेरिएंट जगभरात जलदगतीने पसरतोय. यामध्ये भारत, चीन,अमेरिकेसह अन्य देशांचाही समावेश आहे.

48
डिसेंबर महिन्यातच का वाढतो कोरोनाचा धोका?

थंडीच्या दिवसात कोरोना व्हायरसचा फैलाव मोठ्या प्रमाणात होत असल्याचे आढळले आहे. उष्ण हवामानाच्या ठिकाणी राहणाऱ्या लोकांच्या तुलनेत थंड हवामानात राहणाऱ्या लोकांना या विषाणूचा अधिक संसर्ग होतो, असे म्हणतात.

58
सामाजिक कार्यक्रम व सुट्ट्यांमुळे वाढतो कोरोनाचा प्रादुर्भाव?

तज्ज्ञांच्या मते, डिसेंबर महिना म्हणजे सुट्ट्यांचा हंगाम आणि या दिवसांत वेगवेगळ्या सामाजिक कार्यक्रमांचेही आयोजन केले जाते. यामुळे डिसेंबर महिन्यात जास्तीत जास्त लोकांना कोरोनाची लागण होते.

68
तज्ज्ञांनी काय दिला सल्ला?

तज्ज्ञांच्या मते, कोरोनाच्या या व्हेरिएंटमुळे घाबरण्याची आवश्यकता नाही. पण बदलत्या हवामानामुळे सावधगिरी बाळगण्याचा सल्ला नक्की दिला जात आहे.

78
लसीकरण आणि मास्क वापरणे आवश्यक

कोरोनाच्या नवीन व्हेरिएंटपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी मास्क वापरणे गरजेचं आहे. याव्यतिरिक्त लसीकरण देखील महत्त्वाचे आहे.

88
तज्ज्ञांचा सल्ला

Disclaimer : सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

आणखी वाचा :

रक्तशुद्धी करायचीय? मग जाणून घ्या हे नैसर्गिक रामबाण उपाय

Matar Recipe : तुमची मुले पौष्टिक पदार्थ खाणे टाळतात? मग जाणून घ्या मटारच्या या खमंग रेसिपी

Heart Attack : खरंच या वेळेस जेवल्यास हृदयविकाराचा धोका कमी होतो? जाणून घ्या रीसर्चमधील माहिती

Share this Photo Gallery