महिलांना एखाद्या ठिकाणी एकटे प्रवास करताना नेहमीच सुरक्षिततेची चिंता सतावत असते. अलीकडल्या काळात महिलांवर होणाऱ्या अत्याचारांमुळे पालक आपल्या मुलींना घराबाहेर पाठवण्यास देखील घाबरतात. देशात एका बाजूला कोलकातामधील महिला डॉक्टरची हत्या आणि बलत्कार प्रकरण तर दुसऱ्या बाजूला बदलापूरमधील शाळेतील दोन अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण केल्याच्या घटनेने नागरिक संतप्त आहेत. अशातच तुम्ही एकटे प्रवास करत असाल अथवा तुमची मुलगी एखाद्या ठिकाणी एकटी जात असल्यास तिच्याबद्दल चिंता करण्याची गरज नाही. खरंतर, तरुणींसह महिलांनी आपल्या बॅगेत काही सेफ्टी टूल्स ठेवल्या पाहिजेत. जेणेकरुन आपत्कालीन स्थिती उद्भवल्यास त्या वस्तूंचा वापर स्वत:च्या सुरक्षिततेसाठी करता येईल.