Ganesh Chaturthi 2024 : येत्या 7 ऑगस्टला गणेशोत्सवाचा सण साजरा केला जाणार आहे. खरंतर, देशभरात गणेशोत्सवाची धूम पहायला मिळते. अशातच मुंबईत विविध गणेश मंडळांच्या गणपतींचे आगमन होण्यास सुरुवात झाली आहे. याचेच काही फोटो समोर आले आहेत.
Chanda Mandavkar | Published : Aug 19, 2024 9:33 AM / Updated: Aug 19 2024, 09:34 AM IST
धारावीचा सुखकर्ता
मुंबईत अनेक गणेश मंडळांच्या महागणपतींचे आगमन होण्यास सुरुवात झाली आहे. नुकत्याच धारावीचा सुखकर्त्याचा आगमन सोहळा पार पडला.
परळचा महाराजा
परळचा महाराजाचा आगमन सोहळ्याला अनेक गणेश भक्तांनी गर्दी केली होती. खरंतर, लालबाग-परळ परिसरातून गणपतींच्या आगमनाचा सोहळ्याची एक वेगळीच धूम पहायला मिळते.
सावरपाड्याचा राजा
बोरिवलीतील सावरपाड्याच्या राजाचे आगमन झाले आहे. गणेशाची मुर्ती खातू यांच्या कारखान्यात तयार करण्यात आली आहे. या भव्यदिव्य गणरायाच्या आगमनाला अनेकांनी ढोल-ताशाच्या ठेक्यावर ताल धरला होता.
गोड गणपती अखिल चंदणवाडी
गिरगावमधील लाडक्या गोड गणपतीची स्वारी बाप्पाच्या मंडपात जल्लोषात विराजमान झाली आहे. यावेळीही अनेक गणेशभक्तांनी गणरायाच्या आगमनाला मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती.
काळाचौकीचा महागणपती आगमन सोहळा
काळाचौकीचा महागणपतीचे आगमनाची वेगळीच धूम मुंबईत पहायला मिळाली. चाळींच्या मधून जाणाऱ्या बाप्पाचे आगमन मोठ्या धुमधडाक्यात करण्यात आले.